मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि कोल्हापूरसह राज्यातील २९ महानगर पालिकांचे(declared)निकाल शुक्रवारी जाहीर झाले. आता सर्वांना उत्सुकता लागली आहे म्हणजे महापौर कोण होणार आहे. आरक्षण सोडत निघाल्यानंतरच महापौर पदाचा चेहरा ठरणार आहे. महापौरपदाचे आरक्षण अद्याप जाहीर झाले नाही त्यामुळे नगरसेवकांची उत्सुकता वाढली आहे. पुढील आठवड्यात नगर विकास खाते महापौर सोडत काढणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. तर जानेवारी अखेरीस महापौर निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.महापौरपदासाठी सोडतून आरक्षण निश्चित केले जाते. सर्वसाधारण पुरूष किंवा महिला, ओबीसी, अनुसूचित जाती व जमाती अशा क्रमाने आरक्षण सोडत काढली जाते. आधी जर सर्वसाधारण गटासाठी महापौरपद असल्यास पुढच्या वेळी म्हणजे आता तो गट वगळून अन्य प्रवर्गाला आरक्षण दिले जाते. जेणेकरून सर्व गटांना सर्वोच्चपद भूषविण्याची संधी मिळेल. आता सर्व २९ महापालिकांचे निकाल लागले आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष महापौर पदाच्या आरक्षणाकडे लागले आहे. ही आरक्षणाची सोडत लवकरच जाहीर केली जाईल. त्यानंतपर राज्यातील सर्व २९ महापालिकांना महापौर मिळेल.

संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या मुंबई महानगर पालिकेवर महायुतीची सत्ता आली. (declared) २२७ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीमध्ये महायुतीचे एकूण ११८ सदस्य निवडून आले. भाजपचे सर्वाधिक ८९ नगरसेवक विजयी झाले आणि भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यानंतर शिवसेना ठाकरे गट हा दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला. ठाकरेसेनेचे ६५ नगरसेवक विजयी झाले. शिवसेना शिंदे गटाचे २९ नगरसेवक विजयी झाले. त्यानंतर मनसे ६, राष्ट्रवादी शरद पवार गट १, राष्ट्रवादी अजित पवार गट ३, काँग्रेस २४, मनसे ६, इतर २ आणि एमआयएम ८ जागांवर विजयी झाले. मुंबईत भाजपने सर्वात जास्त जागा मिळवल्यामुळे भाजपचाच महापौर होणार हे निश्चित आहे.
राज्यातील २९ महानगर पालिकांमध्ये सर्वात जास्त उमेदवार भाजपचे विजयी झाले आहेत. (declared) भाजप १४२५ उमेदवार विजयी झाले. त्यापाठोपाठ सर्वात जास्त ३९९ उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे विजयी झाले. त्यानंतर काँग्रेसचे ३२४, राष्ट्रवादी अजित पवार गट १६७, शिवसेना ठाकरे गट १५५, राष्ट्रवादी शरद पवार गट ३६ , मनसे १३, बहुजन समाजवादी पार्टी ६ आणि एमआयएमचे १२५ उमेदवार विजयी झाले. यानुसार भाजपचे राज्यात अर्ध्यापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपने या विजयानंतर राज्यभर एकच जल्लोष केला.
हेही वाचा :
इचलकरंजीत संजय तेलनाडेंसह कुटुंबातील दोन सदस्यांचाही विजय; राहुल आवाडेंच्या कट्टर समर्थकाचा पराभव
कोल्हापूरच्या प्रभाग क्रमांक४ मध्ये दोन गटात तुफान हाणामरी
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर