कल्याण डोंबिवलीतील ठाकरेसेनेचे 11 नगरसेवक नॉट रिचेबल असल्यानं (corporators) सर्वत्रच खळबळ उडाली. याच 11 नगरसेवकांना शिंदेसेनेकडून गळ घालण्यात आलाय अशी माहिती सूत्रांनी दिलीय. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सत्तास्थापनेचा थरार आता शिगेला पोहोचलाय. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असूनही शिंदेसेना आणि भाजपमध्ये महापौरपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. जोपर्यंत स्वतंत्र गट स्थापन होत नाही तोपर्यंत हे नगरसेवक नॉट रिचेबल राहणार असल्याचं समजतंय..

कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत (corporators)असलं तरी महापौरपदासाठी शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. शिवसेना भाजपकडून ठाकरेंचे नगरसेवक गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चर्चा आहे .या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने मात्र सावध पवित्रा घेतलाय. निवडून आलेले ११ नगरसेवक अज्ञातस्थळी ठेवले असून गट स्थापनेनंतरच पुढची भूमिका स्पष्ट करू असं ठाकरे गटाचे नेते सचिन बासरे यांनी सांगितले. तसेच कोणताही नगरसेवक फुटलेला नाही सर्व नगरसेवक आमच्या पक्ष सोबतच आहेत. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे.(corporators) सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू, पक्ष नेतृत्व आदेश देईल त्याप्रमाणे काम करणार असल्याचे ठाकरे गटाचे नेते सचिन बासरे यांनी सांगितले .
हेही वाचा :
इचलकरंजीत संजय तेलनाडेंसह कुटुंबातील दोन सदस्यांचाही विजय; राहुल आवाडेंच्या कट्टर समर्थकाचा पराभव
कोल्हापूरच्या प्रभाग क्रमांक४ मध्ये दोन गटात तुफान हाणामरी
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर