दररोज परफेक्ट हेअर डे आपोआप मिळावा, असं वाटत असेल तर (hair) त्यासाठी आधी काही चांगल्या सवयी अंगीकाराव्या लागतात. सुंदर, मजबूत आणि सहज सांभाळता येणारे केस एका रात्रीत तयार होत नाहीत. त्यासाठी सातत्याने योग्य काळजी घ्यावी लागते. काही ‘हाय-मेंटेनन्स’ सवयी, जर नियमित केल्या, तर केस नैसर्गिकरित्या हेल्दी, मॅनेजेबल आणि रोजच्या वापरात ‘लो-मेंटेनन्स’ राहतात. यासंदर्भात 2.Oh! चे को-फाउंडर ऋतु विजयवर्गिया यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात.

चांगल्या केसांची खरी ओळख त्यांच्या आतल्या आरोग्यात असते. (hair)संतुलित आहार, पुरेसे पाणी पिणे, आवश्यक सप्लिमेंट्स घेणे आणि वेळेवर झोपणे या सवयी केसांच्या मुळांपासून ताकद देतात. शरीर पोषणयुक्त असेल, तर केस आपोआप चमकदार, दाट आणि मजबूत दिसतात.अनेकदा केस छान न दिसण्याचं कारण म्हणजे चुकीचा कट. तुमच्या चेहऱ्याच्या आकाराला आणि केसांच्या पोताला साजेसा कट करणारा हेअरड्रेसर शोधा आणि ठराविक कालावधीनंतर ट्रिम करत राहा. 8 ते 12 आठवड्यांतून एकदा ट्रिम केल्याने टोकं खराब होत नाहीत, केसांची शेप टिकते आणि कोणत्याही स्टायलिंगशिवाय केस नीट बसतात. चांगला कट असेल, तर ‘गुड हेअर डे’साठी प्रयत्न करावे लागत नाहीत तो आपोआपच मिळतो.
दीर्घकाळ केस निरोगी ठेवायचे असतील, तर ही सवय चुकवू नका. (hair)रिपेअर एजंट्स आणि आर्गन ऑइलयुक्त मास्क केसांना खोलवर ओलावा देतो, फ्रिझ कमी करतो आणि केस मऊ करतो. घरच्या घरी अवोकॅडो, केळी, दही किंवा मध यांसारख्या घटकांपासून बनवलेले नैसर्गिक मास्कही उपयोगी ठरतात. आठवड्यातून एकदा केसांसाठी वेळ काढणं हेच याचं खरं गमक आहे.प्रत्येकाचे केस वेगळे असतात, त्यामुळे रोजची किंवा आठवड्याची केअर रुटीन वैयक्तिक असावी. मात्र काही बेसिक स्टेप्स सगळ्यांसाठी उपयुक्त ठरतात. सौम्य पण प्रभावी क्लेन्झिंगसाठी योग्य शॅम्पू वापरा. त्यानंतर पोषण देणारा मास्क लावा.
पुढे लीव्ह-इन कंडिशनरने केसांचे संरक्षण करा—ही स्टेप अनेकदा ‘बिहेव्ह करणारे’ (hair)आणि ‘न करणारे’ केस यातला फरक ठरवते. शेवटी हलक्या सिरमने रोजचा ताण आणि नुकसान भरून काढा.हलका, ऑल-इन-वन स्टायलिंग स्प्रे केसांची उंची, व्हॉल्युम आणि शेप टिकवतो, तसेच दिवसभर फ्रिझ कंट्रोलमध्ये ठेवतो. नियमित वापरामुळे केस नीटनेटके, गुंतामुक्त आणि पॉलिश्ड दिसतात. केसांचे संरक्षण करताना त्यांना पोषण आणि व्हॉल्युम देणारा स्प्रे निवडा.या सवयी जेव्हा तुमच्या रोजच्या रिच्युअलचा भाग बनतात, तेव्हा ऋतू बदल, प्रदूषण किंवा दैनंदिन ताण केसांवर फारसा परिणाम करत नाही. परिणामी, तुमचे केस रोजच सहज सुंदर दिसतात.
हेही वाचा :
महापालिकेत खुल्या वर्गाला आरक्षण, महापौरपदी कोण विराजमान होणार?
राजकीय भूकंप! भाजप आणि एमआयएमची हातमिळवणी; राज्यातील समीकरणे बदलणार?
२४ लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद