धकाधकीच्या जीवनात सर्दी-खोकल्या सारख्या समस्यांना अनेक जण (determined) दुर्लक्षिक करतात. १२ तास काम करुनही काही लोक पुरेशी झोप घेत नाहीत. काहीजण कामानिमित्त घराबाहेर असल्याने फक्त जंक फूड, स्ट्रीट फूड खाणं पसंत करतात. काहीजण लाइफस्टाइलनुसार दारु, सिगारेटचे सेवन करतात. यामुळे कमी वयातच त्यांना जीवघेण्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामध्ये कॅन्सरसारख्या समस्यांमुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत.

अमेरिकेत ५० वर्षांखालील पुरुषांना या आजारामुळे जीव गमवावा लागला आहे. (determined)तो आजार म्हणजे आतड्यांचा कॅन्सर हा आहे. पुढे आपण हा आजार कसा होतो? व्यसन नसतानाही हा आजार होतो का? आणि वयोगटाबद्दल जाणून घेणार आहोत.आतड्यांच्या आतील आवरणातील पेशींमध्ये जनुकीय बदल होतात. या पेशी नियंत्रणाबाहेर वाढू लागतात आणि पॉलिप्स तयार होतात. काही पॉलिप्स कालांतराने कॅन्सरमध्ये बदलतात. पूर्वी हा कॅन्सर प्रामुख्याने ५० नंतर दिसत होता. पण आता ३० ते ४० वयोगटातही त्याचे प्रमाण वाढत आहे. याची लक्षणे म्हणजे शौच्यावाटे रक्त येणे, सतत पोटदुखी / गॅसचा त्रास, अचानक वजन कमी होणे, वारंवार जुलाब किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होणे आणि सतत थकवा ही आहेत.
अभ्यासानुसार, ५० वर्षांखालील अमेरिकन नागरिकांमध्ये (determined)कोलोरेक्टल कॅन्सरमुळे होणारे मृत्यू दरवर्षी सरासरी १ टक्क्यांहून जास्त प्रमाणात वाढले आहेत. पुरुष आणि महिलांचा एकत्रित विचार करता हा कॅन्सर या वयोगटातील मृत्यूंचं प्रमुख कारण ठरला आहे. याउलट, ल्युकेमिया आणि स्तन कॅन्सरसारख्या इतर रोगांमुळे होणारे मृत्यू दरवर्षी ६ टक्क्यांपर्यंत घटले आहेत.
हेही वाचा :
महापालिकेत खुल्या वर्गाला आरक्षण, महापौरपदी कोण विराजमान होणार?
राजकीय भूकंप! भाजप आणि एमआयएमची हातमिळवणी; राज्यातील समीकरणे बदलणार?
२४ लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद