राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टटॅगबाबत मोठा निर्णय घेतला आहे.(rules)त्यानुसार १ फेब्रुवारी २०२६ पासून जारी करण्यात येणाऱ्या नवीन फास्टटॅगसाठी आता पडताळणी अनिवार्य राहणार नाही. फास्टटॅग जारी करण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगण्यात येत आहे.आतापर्यंत फास्टटॅग जारी झाल्यानंतर वाहनाची खात्री करण्यासाठी KYV प्रक्रिया पार पाडणं आवश्यक होतं. या प्रक्रियेत अनेक वेळा वैध कागदपत्रं असूनही वाहनचालकांना वारंवार आरसी अपलोड करावी लागत होती, फोटो पाठवावे लागत होते आणि टॅग पुन्हा वेरिफाय करावा लागत होता. यामुळे फास्टटॅग अॅक्टिव्ह होण्यास उशीर होत होता तसेच चालकांना अनावश्यक त्रास सहन करावा लागत होता.

आता नव्या नियमांनुसार महामार्ग प्राधिकरणाने ही जबाबदारी पूर्णपणे (rules)बँकांकडे सोपवली आहे. आता फास्टटॅग जारी करण्यापूर्वीच संबंधित वाहनाची सर्व माहिती बँकांकडून तपासली जाणार आहे. वाहनाची पडताळणी ‘वाहन’ अॅपच्या माध्यमातून केली जाईल. जर या अॅपमध्ये माहिती उपलब्ध नसेल, तर वाहन नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच आरसीच्या आधारे तपासणी पूर्ण केली जाईल, अशी माहिती आहे. त्यामुळे फास्टटॅग अॅक्टिव्ह झाल्यानंतर स्वतंत्र KYV प्रक्रियेची गरज राहणार नाही.
Know Your Vehicle ही फास्टटॅग प्रणालीतील एक अतिरिक्त पडताळणी प्रक्रिया होती. (rules)यामध्ये फास्टटॅग योग्य वाहनाशी जोडले आहे का, तसेच चुकीचा किंवा डुप्लिकेट टॅग वापरला जात नाही ना? याची खात्री केली जात होती. मात्र प्रत्यक्षात ही प्रक्रिया करताना अनेकदा तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळेच NHAI ने KYV प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा :
मराठी रीलस्टार प्रथमेश कदमचे दुःखद निधन; चाहत्यांना मोठा धक्का!
प्रत्येक गोष्टीत राजकारण कशाला?…