राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं निधन झाले आहे. (passing)अजित पवारांच्या दुःखद निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर युगेंद्र पवार यांना अश्रू अनावर झाली आहे. युगेंद्र पवारांचा घराबाहेरचा व्हिडिओ समोर आला आहेत. ज्यामध्ये युरेंद्र पवार रडताना दिसत आहेत.अजित पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात निधन झाले. ते सकाळी बारामतीकडे जाताना हा अपघात घडला. लँडिंगदरम्यान विमान घसरल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये त्यांचे दुःखद निधन झाले. अजित पवारांच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. पवार कुटुंबाला खूप धक्का बसला आहे. काकाच्या अचानक जाण्याने युगेंद्र पवार ढसाढसा रडताना दिसत आहे.

अजित पवार आज सकाळी ७.३० च्या सुमारास मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. (passing)त्यांच्या विमानाचा ८.४० वाजता अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यासोबत अजून ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षारक्षक आणि वैमानिक होते. यामधील कोणीही वाचले नसल्याची माहिती समोर आली आहे.
अजित पवार यांच्या जाण्याने कार्यकर्त्यांनाही धक्का बसला आहे. (passing)बारामती येथे रुग्णालयाच्या बाहेर शेकडो कार्यकर्ते जमा झाले आहेत. रोहित पवार, श्रीनिवास पवारदेखील तिथे आले आहेत. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार दिल्लीहून बारामतीकडे रवाना झाले आहे.
हेही वाचा :
मराठी रीलस्टार प्रथमेश कदमचे दुःखद निधन; चाहत्यांना मोठा धक्का!
प्रत्येक गोष्टीत राजकारण कशाला?…