केळी हे केवळ चविष्ट आणि सहज उपलब्ध फळ नसून ते नैसर्गिक ऊर्जेचा (natural energy) उत्कृष्ट स्रोत मानले जाते. केळीमध्ये असलेले ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोज हे शरीराला त्वरित ऊर्जा देतात. त्यामुळे व्यायाम करणाऱ्या व्यक्तींसाठी केळी अत्यंत उपयुक्त ठरते. तज्ज्ञांच्या मते, व्यायामाच्या सुमारे ३० ते ६० मिनिटे आधी केळी खाल्ल्यास स्नायूंना आवश्यक ऊर्जा मिळते आणि थकवा कमी जाणवतो.

केळीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण (natural energy) भरपूर असते. व्यायामादरम्यान होणाऱ्या स्नायूंच्या आकडी किंवा वेदना टाळण्यासाठी पोटॅशियम महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच हे फळ पचायला हलके असल्यामुळे व्यायाम करताना जडपणा जाणवत नाही. व्यायामानंतर ३० मिनिटांच्या आत केळी खाल्ल्यास शरीरातील गमावलेली ऊर्जा भरून निघण्यास मदत होते आणि मसल रिकव्हरी जलद होते.
तथापि, केळी खाण्याची योग्य वेळ लक्षात घेणे गरजेचे आहे. सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी केळी खाणे काही तज्ज्ञ टाळण्याचा सल्ला देतात. केळीमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण तुलनेने जास्त असल्याने रिकाम्या पोटी ते खाल्ल्यास रक्तातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे संतुलन बिघडू शकते, असे मानले जाते. त्यामुळे सकाळी केळी खायची असल्यास ती इतर हलक्या आहारासोबत घेणे अधिक योग्य ठरते.

रात्री उशिरा केळी खाणेही काहींना त्रासदायक ठरू शकते. रात्री (natural energy) शरीराची चयापचय क्रिया मंदावलेली असते, त्यामुळे साखरयुक्त फळे पचायला वेळ लागू शकतो. परिणामी गॅस, अपचन किंवा सर्दी-खोकल्यासारख्या तक्रारी जाणवू शकतात. म्हणूनच केळी खाण्यासाठी सकाळच्या व्यायामानंतरची वेळ किंवा संध्याकाळी ४ ते ६ दरम्यानचा नाश्ता हा उत्तम पर्याय मानला जातो. या वेळेत केळी खाल्ल्यास जंक फूड टाळता येते आणि शरीराला पोषणमूल्यांसह ऊर्जा देखील मिळते.

हेही वाचा :

मुलांसाठी विज्ञान-समर्थित आरोग्यपूरक: ‘वासु सुवर्णप्राशन ड्रॉप्स’चे फायदे आता क्लिनिकली मान्य

कुंडलीतील बुध ग्रह कमकुवत झाल्यास आयुष्यावर कसा होतो परिणाम ?

मोठी बातमी! एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या, सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?