भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी (electric vehicles) झपाट्याने वाढत असताना Maruti Suzuki ने आपल्या पहिल्या पूर्णपणे इलेक्ट्रिक SUV ‘e VITARA’चे अधिकृत लाँचिंग करत मोठी घोषणा केली आहे. कंपनीने या मॉडेलची सुरुवातीची इंट्रोडक्टरी BaaS किंमत 10.99 लाख रुपये ठेवली असून बॅटरीसाठी स्वतंत्रपणे प्रति किमी 3.99 रुपये आकारले जाणार आहेत. इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या दिशेने हे मोठे पाऊल असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. e VITARA ही पूर्णपणे बॅटरीवर चालणारी BEV (Battery Electric Vehicle) असून ती पेट्रोल किंवा डिझेलशिवाय केवळ वीजेवर धावते.

BaaS म्हणजेच बॅटरी-एज-ए-सर्विस या मॉडेलमुळे ग्राहकांना (electric vehicles) बॅटरीची संपूर्ण रक्कम एकदाच भरावी लागत नाही. कारची एक्स-शोरूम किंमत वेगळी असून बॅटरी वापरानुसार प्रति किलोमीटर शुल्क भरावे लागते. त्यामुळे सुरुवातीचा खर्च कमी होतो आणि अधिक ग्राहकांना इलेक्ट्रिक कार खरेदी करणे परवडणारे ठरते. या मॉडेलची पहिली झलक Bharat Mobility Auto Expo 2025 मध्ये पाहायला मिळाली होती. कंपनी ही कार भारतात तयार करून 200 हून अधिक देशांत निर्यात करण्याच्या तयारीत आहे.
ग्राहकांना e VITARA विषयी अधिक माहिती, टेस्ट ड्राइव्ह (electric vehicles) आणि बुकिंगसाठी NEXA शोरूममध्ये भेट देता येणार आहे. तसेच अधिकृत वेबसाइटवरूनही 21,000 रुपयांत बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे. कंपनीकडून सोपे ओनरशिप पर्याय, दीर्घ वॉरंटी आणि विश्वासार्ह चार्जिंग नेटवर्क देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. काही ऑफर्सअंतर्गत होम चार्जर आणि त्याच्या इंस्टॉलेशनची सुविधाही दिली जाणार आहे. मात्र BaaS किंमतीत रोड टॅक्स, विमा आणि अन्य सरकारी शुल्कांचा समावेश नसणार आहे.
डिझाइनच्या बाबतीत e VITARA आधुनिक आणि (electric vehicles) आकर्षक आहे. 4,275 मिमी लांबी, 1,800 मिमी रुंदी आणि 1,640 मिमी उंची असलेली ही SUV 2,700 मिमी व्हीलबेससह प्रशस्त केबिन देते. कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये येणाऱ्या या मॉडेलला भारतीय बाजारात Hyundai ची Creta EV, Tata Motors ची Curvv EV आणि MG Motor ची Windsor EV यांच्याकडून स्पर्धा मिळणार आहे. विशेष म्हणजे Windsor EV लाँच झाल्यानंतर देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक कारपैकी एक ठरली आहे, त्यामुळे या नव्या मॉडेलमुळे स्पर्धा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
आतील भाग अधिक प्रीमियम आणि तंत्रज्ञानसंपन्न (electric vehicles) बनवण्यात आला आहे. 10.25 इंचाचा डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर आणि 10.1 इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम देण्यात आला आहे. सॉफ्ट-टच मटेरियल, ड्युअल-टोन इंटेरिअर, मल्टी-कलर अँबिएंट लायटिंग, वेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि दहा प्रकारे अॅडजस्ट होणारी इलेक्ट्रिक ड्रायव्हर सीट या सुविधा देण्यात आल्या आहेत. 40:20:40 स्प्लिट रिअर सीट्समुळे प्रवास अधिक सोयीस्कर होतो. फिक्स्ड ग्लास सनरूफ आणि Harman ट्युन केलेला ऑडिओ सिस्टम यामुळे केबिन अधिक प्रीमियम अनुभव देते.
या SUV मध्ये हलकी 3-in-1 इलेक्ट्रिक ड्राइव्ह सिस्टम (electric vehicles) देण्यात आली आहे ज्यात मोटर, इन्व्हर्टर आणि ट्रान्समिशन एकाच युनिटमध्ये बसवण्यात आले आहे. त्यामुळे वजन कमी राहते आणि परफॉर्मन्स तसेच रेंज सुधारते. कंपनीने दोन बॅटरी पर्याय उपलब्ध केले आहेत. 49kWh बॅटरी व्हर्जन 144hp पॉवर आणि 189Nm टॉर्क देते, तर 61kWh बॅटरी असलेले मॉडेल 174bhp पॉवर प्रदान करते. परदेशात उपलब्ध असलेल्या ऑल-व्हील ड्राइव्ह व्हर्जनमध्ये अतिरिक्त मोटरमुळे एकूण 184bhp पॉवर आणि 300Nm टॉर्क मिळतो. टॉप व्हेरिएंटची रेंज 543 किमीपेक्षा जास्त असल्याचा दावा करण्यात आला आहे, ज्यामुळे ती आपल्या सेगमेंटमधील सर्वाधिक रेंज देणाऱ्या ईव्हींपैकी एक ठरू शकते.
सुरक्षेच्या दृष्टीनेही या मॉडेलमध्ये विशेष लक्ष (electric vehicles) देण्यात आले आहे. बॉडी स्ट्रक्चरमध्ये 50 टक्क्यांहून अधिक हाई-टेंसाइल स्टीलचा वापर करण्यात आला आहे. स्टँडर्ड फिचर्समध्ये 7 एअरबॅग, चारही चाकांना डिस्क ब्रेक, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि e-Call इमर्जन्सी सुविधा देण्यात आली आहे. लेव्हल-2 ADAS अंतर्गत अॅडॅप्टिव क्रूझ कंट्रोल, लेन कीपिंग असिस्ट आणि ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंगसारखी प्रगत तंत्रज्ञान सुविधा देण्यात आल्या आहेत. एकूणच e VITARA ही मारुती सुझुकीची आतापर्यंतची सर्वात प्रगत, सुरक्षित आणि प्रीमियम इलेक्ट्रिक SUV म्हणून ओळखली जात आहे.
हेही वाचा :
महेंद्रसिंह धोनीवर मोठा अन्याय, सत्य समजताच येईल संताप, खळबळजनक माहिती समोर!
मोठी बातमी! बीजेपीचा बांगलादेशमध्ये झेंडा, लोकसभेची एक जागा जिंकली