असं म्हणतात की भाताचं सेवन आरोग्यास हानिकारक(rice) आहे. मात्र भात खाण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत, कसं ते जाणून घेऊयात…

भात हा अनेकांचा जीव की प्राण आहे. जेवण म्हटलं की खूप जणांना भात खाल्याशिवाय जेवल्यासारखं वाटत नाही. या भाताबद्दल अनेक समज गैरसमज आहेत (rice)भात कोणी खावा आणि किती प्रमाणात खायला हवं याबाबत विचार न करता सर्रासपणे भात खाणं चुकीचं आहे असा एकंंदरीतच समज झालेला आहे, नेमकं भात खाल्याने काय होतं किंवा त्याचा काय परिणाम होतो याबाबत आरोग्यतज्ज्ञ काय म्हणतात ते जाणून घेऊयात.

भात हा भारतीय आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. विशेषतः महाराष्ट्र, गोवा, बंगाल, केरळ, आणि दक्षिण भारतात भात हा प्रमुख अन्नप्रकार मानला जातो. भातामध्ये असलेले पोषणमूल्य अनेक प्रकारे आरोग्यास उपयुक्त ठरते. भात हा कार्बोहायड्रेट्सचा प्रमुख स्रोत आहे. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि दैनंदिन कामासाठी लागणारी ताकद टिकून राहते. विशेषतः सकाळी किंवा दुपारी खाल्लेला भात शरीरास दिवसभर ऊर्जा देतो, असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात.

आहारात भात समाविष्ट केल्याने काय होतं ?
भात पचायला अत्यंत सोपा आहे. त्यामुळे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण भात सहज पचवू शकतात. पचनसंस्थेवर भार न टाकता तो झपाट्याने पचतो, म्हणूनच आजारी व्यक्तींना किंवा पाचनाच्या त्रासांनी त्रस्त असलेल्या लोकांना भात खाण्याचा सल्ला दिला जातो.भातात कोणतेही कोलेस्टेरॉल नसते, त्यामुळे तो हृदयासाठी सुरक्षित मानला जातो. तसेच तो ग्लूटन-फ्रीअसल्याने ज्यांना गहू किंवा मैद्यापासून अ‍ॅलर्जी आहे, त्यांच्यासाठी भात हा एक उत्तम पर्याय ठरतो.

भात खाण्याचे आरोग्यदायी फायदे
भातात लोह, मॅग्नेशियम, आणि जीवनसत्त्वे सुद्धा असतात, जे शरीराच्या एकूण विकासासाठी उपयुक्त ठरतात. भाताचे विविध प्रकार जसे की तांदूळ, ब्राउन राईस, व पोलिश न केलेला भात यामध्ये अधिक फायबर असते, जे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.शेवटी, भात हा स्वस्त, सहज उपलब्ध, आणि विविध प्रकारांनी शिजवता येणारा अन्नघटक आहे. त्यामुळे तो प्रत्येक घरात सहजपणे वापरला जातो.एकंदरीत, भात खाणे केवळ चवदार नाही तर आरोग्यदायी देखील आहे.

भात कोणी खाऊ नये
प्रत्येक पदार्थांचे काही ना काही चांगले वाईट परिणाम आहेत. एखाद्या पदार्थाचं प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्यास त्याचा त्रास देखील होतो. भाताचे जसे फायदे आहेत तसंच काहींसाठी भाताचं अतिसेवन करणं नुकसान करणारं आहे. भात हा आरोग्यदायी असूनही काही विशिष्ट व्यक्तींनी भात खाण्यावर मर्यादा घालणे आवश्यक असते. प्रत्येकाच्या शारीरिक गरजा आणि आजारानुसार आहार निवडावा लागतो. खाली दिलेले काही गट अशा व्यक्तींचे आहेत, ज्यांनी भात खाणे टाळावे किंवा मर्यादित प्रमाणात खायला हवं.

  1. मधुमेह असलेले रुग्ण
    साधा भात यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्समध्ये जास्त असतो, हे घटक रक्तातील साखर झपाट्याने वाढवतात. त्यामुळे मधुमेह असलेल्यांनी साधा भात टाळावा किंवा ब्राउन राईस/फायबरयुक्त भात खाण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  2. जास्त वजन असल्यास
    भातामध्ये जास्त प्रमाणात कॅलरी आणि कार्बोहायड्रेट्स असतात. दररोज जास्त प्रमाणात भात खाल्ल्यास वजन वाढू शक्यता असते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवायचे असल्यास भाताचं सेवन प्रमाण मर्यादित ठेवणे फायदेशीर आहे.
  3. थायरॉईड व हार्मोनल समस्यांनी त्रस्त लोक
    काही प्रकारच्या हार्मोनल आजारांमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण नियंत्रित ठेवणे आवश्यक असते. अशावेळी भाताचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्याने करावे.
  4. रात्री भात टाळावा
    रात्री भात खाल्ल्यास पचन मंद होते, त्यामुळे गॅस, अॅसिडिटी किंवा झोपेच्या त्रासाची शक्यता असते. त्यामुळे रात्री हलका आहार घेणे चांगले, असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात.

हेही वाचा :

१६ वर्षांच्या मुलीवर नराधमांचा बलात्कार, दारू पिऊन बाटली टाकली गुप्तांगात
वडिलांनी घेतले हैवानाचे रूप; 250 गावकऱ्यांसमोरच मुलीच्या तोंडात…
महाभयंकर पुरात अवघं कुटुंब गेलं वाहून; हृदयद्रावक घटनेचा Video Viral