रांची: झारखंडच्या राजधानी रांचीत एका शिक्षकाच्या कृत्यांमुळे पालकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. रांचीच्या रातू रोडवरील श्रद्धानंद सेवाश्रम मध्य विद्यालयमध्ये एका शिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थिनींचा (student)लैंगिक छळ केल्याचे गंभीर आरोप आहेत.

स्थानिक प्रशासनाला मिळालेल्या गुमनाम तक्रारीनुसार, आरोपी शिक्षकाने विद्यार्थिनींशी (student)व्हॉट्सअॅपवर अश्लील चॅटिंग, शारीरिक संबंधासाठी दबाव, तसेच व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. काही मुलींना हॉटेलमध्ये नेण्याचा प्रयत्न देखील केल्याचे सांगितले गेले आहे.

रांचीचे उपायुक्त मंजूनाथ भजंत्री यांना तक्रारीची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ डीईओ आणि डीएसओ यांना तपासाचे निर्देश दिले. जिल्हा शिक्षण विभागाने तपास समिती स्थापन केली असून, शाळेत जाऊन सखोल तपास सुरू केला आहे.

शाळेचे मुख्यध्यापक अनुज कुमार सिंह यांनी सांगितले की, विद्यार्थिनी किंवा पालकांकडून आधी कोणतीही तक्रार आलेली नव्हती. मात्र, गुमनाम पत्र प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने गंभीरतेने कारवाई सुरू केली आहे. सध्या आरोपी शिक्षक शाळेत अनुपस्थित असून, त्याचा फोन देखील लागत नाही.

उपायुक्त मंजूनाथ भजंत्री यांनी स्पष्ट केले की, तपास समिती २४ तासांत अहवाल सादर करेल. जर शिक्षक दोषी आढळला, तर त्याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यासह इतर संबंधित कलमांनुसार कठोर कारवाई केली जाईल.पालकांनीही आपल्या मुलींच्या सुरक्षेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले आहे.

हेही वाचा :

एकनाथ शिंदेगट-महायुतीत फूट पडणार?
अ‍ॅपल यूजर्ससाठी खुशखबर! iPhone 16 Plus वर आकर्षक ऑफर उपलब्ध
 पुढच्या सीझनमध्ये नव्या नावासह मैदानात उतरणार नीता अंबानींची टीम