भारताच्या क्रिकेट आणि बॉलिवूडच्या चाहत्यांमध्ये नेहमीच क्रिकेटपटू (cricketer)आणि अभिनेत्री यांच्यातील नात्यांबाबत चर्चेचा ओघ असतो. याच क्रमात काही दशकांपूर्वी सचिन तेंडुलकर आणि शिल्पा शिरोडकर यांच्यात कथित अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. हा काळ होता सचिनच्या लग्नापूर्वीचा.

नुकतीच शिल्पा शिरोडकरने ‘फिल्म विंडो’ या मुलाखतीत सचिनबरोबरच्या कथित अफेअरवर आपली बाजू मांडली. तिने स्पष्ट केले की, तिचा सचिनसोबत केवळ एक सामाजिक आणि कौटुंबिक संपर्क होता. शिल्पा म्हणाली, “सचिन आणि माझा चुलत भाऊ एकत्र क्रिकेट खेळायचे. त्या वेळी सचिन मोठा क्रिकेटपटू (cricketer)बनत होता, आणि माझा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. मी माझ्या भावाला सांगितलं, मला सचिनला भेटायचं आहे.”

शिल्पाने या भेटीचा तपशीलही सांगितला: “एकदा सचिन माझ्या चुलत भावाच्या घरी आला, तेव्हा मीही तिथे होते. आमची भेट तिथेच घडली.” अफेअरबाबतच्या चर्चांबाबत शिल्पाने स्पष्ट केले, “माझं सचिनसोबत अफेअर सुरू असल्याच्या चर्चा कुठून सुरू झाल्या, याची मला काहीही कल्पना नाही. त्या वेळी एका वृत्तपत्राने याबाबत लेख दिला होता. लोक अजूनही मला विचारतात, पण आमच्यात काहीच नव्हतं. त्यानंतर मी पुन्हा सचिनला भेटले नाही.”शिल्पाने आपल्याकडून या चर्चांवर पडदा टाकल्याचे स्पष्ट केले असून, या मुलाखतीत तिने आपली खरी बाजू प्रेक्षकांसमोर मांडली.

हेही वाचा :

Lamborghini पळवण्याचा मोह 52 वर्षीय ड्रायव्हरला पडला महागात…
देवेंद्र फडणवीस यांनी केले एकनाथ शिंदेंचे अभिनंदन
 लग्नाच्या पहिल्याच रात्री घडायचं असं काही की….