सोलापुरात भरदिवसा थरारक हत्याकांडाची घटना समोर आली आहे. जीमवरून घरी परतणाऱ्या सुरेश कृष्णा श्रीराम (वय ३५, रा. रफिक नगर, अक्कलकोट रोड एमआयडीसी) याची सहा (shocking murder case) जणांनी भर चौकात निर्घृण हत्या केली. सकाळी नऊच्या सुमारास ७० फूट रोडवर दुचाकीवरून जात असताना एका आरोपीने मागून काठीने जोरदार प्रहार केला. त्यामुळे सुरेश रस्त्यावर कोसळला. त्यानंतर दबा धरून बसलेल्या सहा जणांनी कोयत्याने सात ते आठ वार केले. शेवटी एका आरोपीने मोठा दगड डोक्यात घालून चेहरा विद्रूप केला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले.

मृत सुरेश श्रीराम हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्याविरुद्ध विनयभंग, चोरी, दरोडा आणि मारामारीसह दहा गुन्हे दाखल होते. दुसरीकडे आरोपींपैकी तिघांवरही पूर्वीचे गुन्हे नोंद आहेत. या प्रकरणी मृताची पत्नी लक्ष्मी श्रीराम यांच्या फिर्यादीवरून जेलरोड पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अवघ्या दोन तासांत मौलाली चौक परिसरातून सर्व संशयितांना ताब्यात घेतले.
या हत्येमागे जुना वाद कारणीभूत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. २०१७ पासून रेड्डी आणि श्रीराम कुटुंबीयांमध्ये वराह पालनावरून वाद सुरू होता. सुरेशने विष देऊन काही वराह मारल्याचा संशय आरोपींना होता. त्यातून दोन्ही गटांमध्ये सतत संघर्ष सुरू होता. २०२० मध्येही आरोपींनी सुरेशला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी सुरू होणार होती. त्याच खटल्यातील केस मागे घेण्यासाठी आरोपींकडून सुरेशवर दबाव टाकला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
हत्येपूर्वी आरोपींनी मोबाईल स्टेटसवर रक्तचरित्र चित्रपटातील ‘एक साथ नहीं, एक एक कर के मारेंगे’ हा डायलॉग ठेवला होता. त्यामुळे हा खून कट रचून करण्यात आल्याचा संशय अधिक गडद झाला आहे. पोलिसांनी विजय अशोक श्रीराम, रोहित बसप्पा अण्णारेड्डी, करण अशोक श्रीराम, सुमीत अशोक श्रीराम, राहुल बसप्पा अण्णारेड्डी आणि सुभाष सगडा यांना अटक केली आहे. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
दरम्यान, सुरेशचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी घटनास्थळीच आक्रोश केला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली असून, त्यात सुरेश खाली पडल्यानंतर आरोपी त्याच्यावर तुटून पडल्याचे स्पष्ट दिसत आहे. मृत सुरेशच्या पश्चात तीन पत्नी, सहा मुली आणि दोन मुलगे असा परिवार आहे. पतीच्या हत्येमुळे आठ लेकरं अनाथ झाली असून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
हेही वाचा
आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल
लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद
मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ?