मेष रास
मेष राशीच्या लोकांनो आज जनमानसामध्ये (good)स्वतःची प्रतिमा ठसवण्याचे काम तुमच्याकडून चांगले होईल

वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांनो आज कोणत्याही प्रसंगाला(good) न घाबरता जशास तसे धोरण ठेवून काम पुढे न्याल

मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांनो आज महिला जास्त तडफदार बनतील, सौम्य परंतु ठाम स्वरामध्ये स्वतःचे कर्तुत्व दाखवाल

कर्क रास
कर्क राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी काम करताना वातावरणातील मरगळ थोडी जाणवणार आहे, त्यामुळे उत्साह कमी राहील

सिंह रास
सिंह राशीच्या लोकांनो आज तज्ञांच्या सल्ल्याने एखादी आर्थिक गुंतवणूक करायला हरकत नाही, व्यवसायात जादा भांडवलाची गरज भासेल

कन्या रास
कन्या राशीच्या लोकांनो आज कर्ज घेण्याचा मोह होईल, परंतु अंथरूण पाहून पाय पसरणे गरजेचे ठरेल

तूळ रास
तूळ राशीच्या लोकांनो आज ज्यांना त्वचारोगाचे विकार आहेत, त्यांनी डॉक्टर इलाज आणि पथ्य पाणी सांभाळावे, महिलांनी कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नये

वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज खोटी स्तुती तुम्हाला कधीच भूल पाडत नाही किंवा टीकेने तुम्ही कोमेजणार नाही, यामुळे तुमच्या वाटेला जायचे लोक प्रकर्षाने टाळतील

धनु रास
धनु राशीच्या लोकांनो आज एखाद्या कामाबाबत चिकाटी ठेवण्यात थोडे कमी पडाल आणि तेथे संभ्रमावस्था सुद्धा निर्माण होऊ शकते

मकर रास
मकर राशीच्या लोकांनो आज नोकरीमध्ये थोडा दूरदर्शीपणा ठेवायला लागेल आणि त्याप्रमाणे कामाची पद्धत अवलंबावी लागेल

कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांनो आज कधी कधी कोणताही निर्णय घेण्याबाबत तुमच्याकडून विचार होऊ शकतो, ही गोष्ट आज सांभाळायला हवी

मीन रास
मीन राशीच्या लोकांनो आज कोर्ट कचेरीची कामे रेंगाळण्याची शक्यता आहे. प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

हेही वाचा :

भारत-पाक क्रिकेटवर दिलजीत दोसांझचे सवाल! ‘माझा मुव्ही

…तर शिवसेना शेतकऱ्यांसह थेट रस्त्यावर उतरणार, उद्धव ठाकरेंचा….

परीक्षेला निघालेल्या विद्यार्थिनीला कारनं उडवलं