आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन हा केवळ मोठ्यांसाठीच नाही (mobile)तर लहान मुलांसाठीही दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे. गेम खेळणे, व्हिडिओ पाहणे, सोशल मीडिया वापरणे या सर्व गोष्टींमुळे मुलं तासंतास मोबाईल मध्ये गुंतून राहतात. मात्र, याचा त्यांच्या अभ्यास, खेळणं आणि झोपेवर गंभीर परिणाम होतो. पालकांसाठी मोठी चिंता म्हणजे मुलांचा वाढता स्क्रीन टाईम. कारण वेळेवर लक्ष न दिल्यास ही सवय हळूहळू व्यसनात बदलते. डॉक्टरांचही मत आहे की जास्त मोबाईल वापरल्यामुळे डोळ्यांच्या समस्या, झोप न लागणे आणि मानसिक अस्वस्थता निर्माण होऊ शकते. त्यामुळे मुलांमध्ये योग्य ते बदल घडवण्यासाठी पालकांनी महत्त्वाची पावले उचलणं गरजेचे आहे.

सर्वातआधी, पालकांनी मुलांसाठी मोबाईल वापरण्याची एक ठराविक वेळ निश्चित करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, शाळेतून परत आल्यावर फक्त एक तास मोबाईल देणे किंवा गृहपाठ पूर्ण केल्यानंतरच फोन वापरण्याची परवानगी देणे. अशा नियमांमुळे मुलं शिस्त पाळतील आणि मोबाईल त्यांना व्यसन नव्हे तर बक्षीस वाटेल.मोबाईलच्या ऐवजी मुलांना मैदानी खेळांकडे वळवण खूप महत्त्वाचं आहे. क्रिकेट, फुटबॉल, सायकलिंग यांसारख्या खेळात त्यांचं लक्ष लागल्यास शारीरिक तंदुरुस्ती सुधारेल आणि मोबाईलची ओढही कमी होईल. (mobile)त्याचप्रमाणे चित्रकला, संगीत, नृत्य किंवा वाचन यांसारख्या छंदाकडे मुलांना वळवल्यास त्यांची एकाग्रता वाढेल कुटुंबासोबत वेळ घालवणं हा ही उत्तम उपाय आहे. रोज काही वेळ पालकांनी मुलांसोबत खेळणं, गप्पा मारणं किंवा एकत्रित उपक्रम करणे त्यामुळे त्यांचा वेळ चांगल्या प्रकारे जाईल आणि मोबाईल वापरण्याची गरज भासणार नाही.

पालकांनी आपल्या मुलांना मोबाईलच्या दुष्परिणामांची साध्या भाषेत माहिती दिली तर मुलं त्याला गंभीरतेने घेऊ लागतील.सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालकांनी स्वतः मोबाईल जास्त न वापरावा.(mobile) पालकांना सतत फोन मध्ये गुंतलेलं पाहून मुलही तेच शिकतात. त्यामुळे मुलांसमोर मोबाईल वापरणं कमी करणे आणि त्यांना सकारात्मक उदाहरण दाखवणेही गरजेचे आहे.आजच्या काळात मोबाईल पूर्णपणे टाळणं शक्य नाही, पण योग्य नियंत्रण ठेवणं मात्र नक्कीच शक्य आहे. कुटुंबासोबतचा जास्तीत जास्त वेळ या साध्या उपायांनी मुलांचा स्क्रीन टाइम मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. पालकांनी संयम आणि सातत्य ठेवल्यास मुलं मोबाईलच्या सवयीपासून मुक्त होतील आणि त्यांच्या आरोग्यदायी, संतुलित आयुष्याला खऱ्या अर्थाने दिशा मिळेल.

हेही वाचा :

असं खाल तर लवकर जाल! 

 तिलक-दुबेने फलंदाजीत, तर कुलदीपने गोलंदाजीत गाजवले मैदान;

भारताच्या संघाने आशिया कप 2025 जिंकूनही ट्राॅफीशिवाय साजरा केला विजय!