इचलकरंजी :

कै. प्रकाश शंकर मगदुम स्मरणार्थ व खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती,(students)शाखा-इचलकरंजी तसेच एस.टी. फौडेशन स्पर्धा परीक्षा केन्द्र इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरस्तरीय गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण सोहळा व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा २०२५ रविवारी दि. ५ ऑक्टोबर रोजी दु ३ वा. श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह, इचलकरंजी येथे पार पडणार आहे.या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण तथा कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री मंत्री मा.श्री. प्रकाशराव आबिटकर, आमदार डॉ. राहुल आवाडे व आमदार अशोक माने या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री. अशोक स्वामी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ, मुंबई असतील .

प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री. बी.एम. कसार शिक्षणाधिकारी, इचलकरंजी म.न.पा., मा.श्री. भरत रसाळे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक समिती,(students) मा.श्री. रवींद्र माने जिल्हा प्रमुख, शिवसेना, मा.सौ. सिमा तेलनाडे सामाजिक कार्यकर्त्या व उद्योजक मा.श्री. विजय गलगले उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमात शहरातील गुणवान विद्यार्थ्यांना तसेच आदर्श शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

पुरस्कारप्राप्तांमध्ये मुख्याध्यापिका मा.सौ. निर्मला विजय चौगुले,(students) मा.कु. सुशांता बापू चौगुले, मुख्याध्यापक मा.श्री. किरणकुमार कोकणे, मा.सौ. सुचिता सुनिल अलमान, शिक्षक मा.श्री. बाळासाहेब आनंदराव पवार व मा.श्री. आनंद शांताराम कांबळे यांचा समावेश आहे.या भव्य सोहळ्याचे प्रास्ताविक समितीचे कार्याध्यक्ष श्री. शिलत खानाज करणार असून स्वागत, संयोजन व आभारप्रदर्शनाची जबाबदारी समितीच्या पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. शहरातील नागरिक, पालक व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

हेही वाचा :

आजपासून कागदी बाँड हद्दपार तर नव्या E-Bondची एंट्री; राज्य सरकारचा मोठा निर्णय

महानगरपालिका मुख्यालयातील सार्वजनिक टॉयलेट्स नागरिक व कर्मचाऱ्यांसाठी खुले करा उमाकांत दाभोळे .

राजकीय कार्यकर्त्याच्या घरातून 11 सशस्त्र गुंडांना अटक; एटीएसच्या कारवाईने एकच खळबळ…