कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

पाच लाख शाखा आणि 14 कोटी स्वयंसेवक असलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ(branches)ही सांस्कृतिक, राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी संघटना जगातील एक मोठी संघटना समजली जाते. दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी या संघटनेने शताब्दी वर्षात प्रवेश केला आहे. त्यानिमित्ताने संघ मुख्यालय असलेल्या नागपूरसह देशातील अनेक शहरांमध्ये संघ शताब्दीचा समारंभ संपन्न झाला.आंबेडकरवादी चळवळीतील एक प्रमुख नेते माजी राज्यपाल, माजी खासदार, माजी आमदार अशी अनेक सन्मानाची पदे भूषवलेल्या बुद्धवासी रा.सु. गवई यांच्या पत्नी आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री श्रीमती कमलताई गवई यांना संघशताब्दीच्या मुख्य समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर मोहन भागवत यांनी त्यांना खास निमंत्रण दिले होते. या कार्यक्रमाला त्या जाणारही होत्या आणि आपले आंबेडकरी विचार मांडणार होत्या तथापि त्यांनी हा कार्यक्रम स्वीकारू नये असे आवाहन आंबेडकरी चळवळीतील अनेक नेत्यांनी त्यांना केले त्यामुळे त्या शताब्दी कार्यक्रमास गेल्या नाहीत.

वास्तविक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिराला महात्मा गांधी यांनी भेट दिली होती. (branches)अगदी अलीकडच्या काळात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नागपूरच्या रेशीम बाग येथील संघ मुख्यालयास एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट दिली होती. त्यांनी तेथे उपस्थित राहूनही आपली एक वेगळी ओळख अधोरेखित केली होती आणि ती म्हणजे संघाच्या प्रार्थनेच्या वेळी ते उठून उभे राहिले नव्हते.स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेस आणि महात्मा गांधी यांच्याकडून अल्पसंख्यांक समाजाचे लाड केले जात होते, हिंदूंना मात्र तत्कालीन सर्वच नेत्यांनी गृहीत धरले होते. हे गृहीतक केशव बळीराम हेडगेवार यांना सहन झाले नाही, रुचले नाही. म्हणून मग त्यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेऊन दिनांक 27 सप्टेंबर 1925 रोजी नागपूर येथील त्यांच्या”शुक्रवारी”नामक निवासस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. हिंदूंच्या हिताची काळजी घेणारी संघटना म्हणून तेव्हा काँग्रेस मधील अनेकांनी संघाला मूक समर्थन दिले होते.

हिंदुत्ववादी, सामाजिक, कौटुंबिक संघटना म्हणून संघाने सामाजिक आणि सांस्कृतिक स्वरूपात काम सुरू केले. नैसर्गिक आपत्तीमध्ये प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन काम करणारी संघटना म्हणून संघाकडे पाहिले जात होते.भारत आणि चीन युद्धामध्ये संघाच्या स्वयंसेवकांनी आपले योगदान दिले होते आणि त्याबद्दल संघाचे देशभरातून कौतुक झाले होते. जागृत, सशक्त, संघटित, समर्थ राष्ट्राच्या निर्माणासाठी संघाने आपले योगदान दिले आहे.(branches)निद्रिस्त भारत जागृत करण्यासाठी संघाने काही नवीन शाखा स्थापन केल्या.राजकीय शाखा म्हणून जनसंघाची स्थापना करण्यात आली. भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद, सहकार भारती, राष्ट्रीय सेविका समिती अशा अनेक शाखां स्थापन करणाऱ्या संघाची शताब्दी कडे वाटचाल शताब्दी कडे सुरू राहीली.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या”प्रभात”आणि”सायं शाखा” रोज कार्यरत असतात. संघाचे देशभर आणि देशाबाहेरही 14 कोटी स्वयंसेवक आहेत. म्हणूनच जगातील सर्वात मोठी संघटना म्हणून संघाकडे पाहिले जाते.


डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार, माधव गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, राजेंद्र सिंह उर्फ राजू भैय्या, के एस सुदर्शन यांच्यानंतर डॉक्टर मोहन भागवत हे संघाचे सरसंघचालक आहेत.अगदी सुरुवातीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक हे ब्राह्मणी होते.आजही बहुतांशी स्वयंसेवक हे ब्राह्मण समाजातील आहेत. (branches)म्हणून मग या संघाबद्दल उलट सुलट चर्चा होत राहिली. संघामध्ये कोणालाही “जात” या विषयावरून प्रवेश नाकारला जात नाही. संघटनेचे नेतृत्व हे ब्राह्मण व्यक्तीकडे येत राहिल्यामुळे संघावर ब्राह्मणी शिक्का बसला होता. आता मात्र हा शिक्का पुसण्याचा प्रयत्न संघाकडून प्रामाणिकपणे केला जात असल्याचे चित्र आहे. आज अनेक अठरा पगड जातीमधील लोक संघामध्ये आहेत.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल हिंदू महासभेचे संस्थापक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची मते काहीशी प्रतिकूल होती. ते आरएसएस वर टीका करत असत. याबद्दल अटल बिहारी बाजपेयी यांनी अनेकदा बोलून दाखवले आहे. पण तरीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्वातंत्र्यवीरांना कायमच सन्मान दिला जातो.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा मनुवादी आहे. नथुराम गोडसे हा मनुवादी होता. आणि त्याने मनुवादी प्रवृत्तीतूनच
महात्मा गांधी यांचा वध केला असे काँग्रेस सह अन्य काही राजकीय पक्षांकडून हल्लाबोल केला जातो. प्रत्यक्षात मात्र नथुराम गोडसे आणि संघ यांचा काहीही संबंध नव्हता आणि नाही.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय शाखा म्हणून पूर्वीच्या जनसंघाकडे आणि आत्ताच्या भारतीय जनता पक्षाकडे पाहिले जात असले तरी संघाने कधीही राजकारण केले नाही. भारतीय जनता पक्षाच्या व्यासपीठावरून राजकीय भाषणे केलीनाहीत.(branches) मात्र संघाचे स्वयंसेवक भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी फिल्डवर काम करताना दिसतात. संघाचे विद्यमान सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे काही निमित्ताने राजकीय विषयांवर आपली मते व्यक्त करत असतात. अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षावरही प्रसंगी ते टीका करताना दिसतात.एक समर्थ भारत घडवण्यासाठी, आणि त्यासाठी आवश्यक असलेला विद्यार्थी घडवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना केली.

विद्यार्थी हा देश घडवत असतो आणि म्हणूनच विद्यार्थ्यांकडे राष्ट्राची संभाव्य ऊर्जा म्हणून संघाने पाहिले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आदेश दिला तर राजकारणात जावे लागते आणि अशा आदेशातूनच आज भारतीय जनता पक्षामध्ये अनेक जण दिसतात आणि त्यांचे मूळ संघ शाखा आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते आज राजकारणात सक्रिय आहेत.राष्ट्र उभारणीसाठी एक चारित्र्यसंपन्न पिढी घडवण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केले आहे.संघाने लाखो स्वयंसेवक असे घडवले आहेत की, ते समर्पित भावनेने काम करताना दिसतात.(branches)डॉक्टर मोहन भागवत यांनी मुस्लिम धर्मगुरूंना त्यांच्या प्रार्थनास्थळात जाऊन भेटणे, ख्रिश्चन, शिख,पारसी यांच्या व्यासपीठावर उपस्थिती लावणे किंवा त्यांना संघाच्या कार्यक्रमास निमंत्रित करणे हे सर्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यापक दृष्टिकोनातून घडताना दिसते आहे.

नागपूर येथील डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या”शुक्रवारी”या निवासस्थानी स्थापना करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थान शुक्र ताऱ्याप्रमाणे अढळ आहे. काही वर्षांपूर्वी कोल्हापुरात शाहू स्मारक भवन येथे झालेल्या एका कार्यक्रमात संघाच्या वतीने”संघ सरिता”या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले होते. (branches)या ग्रंथात संघाच्या एकूण कामाची समग्र माहिती देण्यात आलेली आहे.कोल्हापूरचा विचार केला तर इथे ब्राह्मण/ब्राह्मणेतर असा एक वाद होता. परिणामी येथे संघ फारसा रुजला नाही किंवा त्याच्या शाखाही फारशा चालल्या नाहीत. पण तरीही तेव्हा मुठभर असलेल्या संघ स्वयंसेवकांनी अथक प्रयत्न करून संघाचे महत्त्व वाढवलेले आहे. संघ स्वयंसेवकांच्या मुळेच कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष विस्तारतो आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेल्या शंभर वर्षात एकदाही वादग्रस्त भूमिका घेतलेली नाही. संघ स्वयंसेवक समर्पित भावनेने काम करतात.

संघाच्या अंतरंगात डोकावण्याचा अनेकांना मोह झालेला आहे. (branches)मग ते महात्मा गांधी असोत, सरदार वल्लभभाई पटेल असोत. संघाच्या व्यासपीठावरून आपली स्वतंत्र अशी वैचारिक बैठक की जी संघाला अनुकूल नाही, मांडण्याचा प्रयत्न अनेक विचारवंतांनी केला आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक किंवा अन्य वरिष्ठ पदाधिकारी हे केव्हाही थेटपणे राजकारणावर भाष्य करीत नाहीत. पण भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना मार्गदर्शन करण्याची भूमिका संघाची असते आणि आहे. आजही काही राजकीय निर्णय संघ प्रभावित असतात.आणि ते लपून राहिलेले नाहीत.

हेही वाचा :

किंमत फक्त 55 हजारांपासून सुरु…

चंद्राच्या मंद प्रकाशाला मधुर दुधाची साथ…!

आज कोजागिरी पौर्णिमेचा दिवस राशींसाठी भाग्यशाली; अचानक होणार धनलाभ, आजचे राशीभविष्य