कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांमध्ये स्थावर आणि जंगम मालमत्तेच्या वाटणीवरून वाद होतात.(death) असे वाद होणे नवे नाही. पण जे गैर आहे, चुकीचे आहे नेमके तेच करणाऱ्या राजकारण्यांना काय म्हणाल?शिवसेनेचे संस्थापक प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन होऊन एक तप उलटून गेले आहे. आणि आता त्यावर रामदास कदम यांनी खळबळजनक विधान करून महाराष्ट्राच्या राजकारणात अपरिपक्वतेचे दर्शन घडवले आहे. बाळासाहेबांचा मृत्यू उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रापासून दोन दिवस लपवून ठेवला होता या आरोपावरून रामदास कदम आणि अनिल परब यांच्यात वादाचा भडका उडाला आहे.इसवी सन 2012 च्या दीपावली सणाच्या दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती गंभीर बनली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. याचा अर्थ त्यांना कृत्रिम रित्या जिवंत ठेवले होते. ऐन दीपावली उत्सवात त्यांचा श्वास थांबला तर राज्यात शोककळा पसरेल. असा विचार करून त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवले असावे.

आणि दीपावली सण संपल्यानंतर व्हेंटिलेटर काढला आणि त्यांनी शेवटचा श्वास घेतला. असे मातोश्रीवर तेव्हा घडले असावे. याचा अर्थ त्यांचा मृत्यू झाल्यानंतर तो दोन दिवसांनी जाहीर केला असा होत नाही. फार फार तर त्यांचा मृत्यू कृत्रिमरित्या पुढे ढकलण्यात आला असेल. पण बाळासाहेबांचा अचेतन देह दोन दिवस तसाच ठेवला आणि या दोन दिवसात त्यांच्या अंगठ्याचे ठसे काही महत्त्वाच्या कागदपत्रावर घेतले असा दावा रामदास कदम यांनी केला आहे. (death)त्यांनी केलेला दावा वैद्यकीय शास्त्रात बसत नाही आणि बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर तब्बल तेरा वर्षांनी हा मुद्दा किंवा विषय त्यांनी कशासाठी उपस्थित केला आहे? रामदास कदम यांना त्यातून काय सिद्ध करावयाचे आहे?
या दोन प्रश्नांचे उत्तर राजकारण असेच येते. एखाद्याच्या मृत्यूनंतर राजकारण करण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही पण आता राजकारण परंपरेला छेद देणारे होताना दिसते आहे. अशा प्रकारच्या संवेदनशील दाव्यातून रामदास कदम यांची अपरिपक्वता दिसून येते.सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असलेले रामदास कदम हे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूची विशेष पोलीस तपास पथकाकडून चौकशी केली जावी अशी मागणी करणार आहेत. अशा प्रकारची मागणी ही पूर्णतः बालिश आहे. मुळातच अशा प्रकारची चौकशी केली जाऊ शकत नाही. त्यांच्या मृत्यूबद्दल त्यांच्या कुटुंबीयांना काही संशय असेल तर त्यांच्याकडून अशा प्रकारची मागणी केली जाऊ शकते किंवा त्यांना तसा अधिकार आहे.
रामदास कदम यांनी खळबळजनक दावा केल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी कदम यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे जाहीर केले. अनिल परब हे उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत.
ते वकील आहेत. रामदास कदम यांनी केलेला दावा कसा फोल आहे याचे त्यांनी विश्लेषण केले आहे.रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती कदम या इसवी सन 1993 मध्ये जळाल्या होत्या. परब यांनी मात्र त्या जळाल्या की त्यांना जाळले असा सवाल उपस्थित केल्यानंतर घरामध्ये स्टो स्टोव्हचा भडका उडून त्यांच्या साडीला आग लागली होती. (death)पण ही आग मीच विझवली असा खुलासा कदम यांनी केला असला तरी परब यांनी मात्र या घटनेची चौकशी गृहराज्यमंत्री असलेले त्यांच्या चिरंजीवांनी करावी अशी उपरोधिक मागणी केली आहे. पत्नीचे जळीत प्रकरण परब यांनी काढल्यामुळे रामदास कदम हे चांगलेच भडकलेले आहेत. त्यांनीही परब यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे सांगितले आहे.

राजकारण हे खाजगी आयुष्यापासून दूर ठेवले पाहिजे किंवा एखाद्या राजकीय व्यक्तींच्या खाजगी आयुष्यावर बोलू नये असे शिष्टाचार आहेत तसे संकेत आहेत. पण दोघांनी हे शिष्टाचार पाळलेले नाहीत असे म्हणावे लागेल. मुळातच खाजगीत काही घडलेल्या गोष्टींवर जाहीरपणे कसे काय बोलले जाते?(death)बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू उद्धव ठाकरे यांनी दोन दिवस लपवून ठेवला होता हे आत्ता जाहीर करणारे रामदास कदम हे उद्धव ठाकरे यांच्यामुळे मंत्री बनले होते. तेव्हा ते उद्धव ठाकरे यांना आपला नेता म्हणत होते. अनिल परब यांनाही ज्योती कदम जळीत प्रकरण तेव्हा माहीत होते मग त्यांनी ते आता उकरून काढायची काय गरज होती? अलीकडच्या काळातील राजकारणाचा पोत काहीसा बिघडला आहे. आणि कदम व परब यांच्यातील आरोप प्रत्यारोपामुळे ते सिद्ध झाले आहे.
हेही वाचा :
किंमत फक्त 55 हजारांपासून सुरु…
चंद्राच्या मंद प्रकाशाला मधुर दुधाची साथ…!
आज कोजागिरी पौर्णिमेचा दिवस राशींसाठी भाग्यशाली; अचानक होणार धनलाभ, आजचे राशीभविष्य