‘मी तुला आयुष्यभर सांभाळतो, तुझ्या संपर्कात राहतो. तुझ्याशी लग्न करतो’, (promise)असे आमिष दाखवून वेळोवेळी अनैतिक संबंध ठेवून लग्नास नकार दिल्याने पोलिस हवालदार सुनील बळीराम कुंभार सध्या नेमणूक चंदगड पोलिस ठाणे वय ४७, रा. तळसंदे याच्यावर गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे.

पोलिसांतून आणि घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, पीडित महिला एका जुन्या प्रकरणात एक वर्षापूर्वी गांधीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आली होती.(promise) त्या प्रकरणाचा तपास सुनील कुंभार याच्याकडेच होता. तपासादरम्यान दोघांची चांगली ओळख झाली. त्यातून त्यांचे प्रेमसंबंध जुळून आले.

त्याने महिलेच्या भाड्याच्या राहत्या घरी तसेच अन्य ठिकाणी अनैतिक संबंध ठेवले.(promise) महिलेने लग्न करून एकत्र राहण्यासाठी आग्रह केला. त्यावेळेस दोघांमध्ये वारंवार भांडणे सुरू झाली. संशयिताने लग्न करण्यास नकार देऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याची धमकी दिली. त्यावरून पीडित महिलेने गांधीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा :

किंमत फक्त 55 हजारांपासून सुरु…

चंद्राच्या मंद प्रकाशाला मधुर दुधाची साथ…!

आज कोजागिरी पौर्णिमेचा दिवस राशींसाठी भाग्यशाली; अचानक होणार धनलाभ, आजचे राशीभविष्य