राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.(elections) या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणूनच लढवल्या जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. काही अपवादात्मक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती देखील होतील, मात्र आमच्यासाठी पहिला पर्याय हा महायुतीच असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.मात्र दुसरीकडे शनिवारी जळगावमध्ये बोलताना भाजपसोबतच्या युतीबाबत शिवेसनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भाजप एकीकडे युतीबाबत बोलते, तर दुसरीकडे एकांतात स्वबळावर निवडणुका लढवण्याची भाषा करते, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

त्याच प्रमाणे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडून देखील काही दिवसांपूर्वी स्वबळाचे संकेत देण्यात आले आहेत, त्यामुळे या निवडणुका महायुती म्हणूनच लढवल्या जाणार का? (elections) हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू असतानाच आता दुसरीकडे शिवसेना शिंदे गटानं रायगडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि माजी पंचायत समिती सदस्य दया पवार यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. या प्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक वाढल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. (elections) विशेष म्हणजे रायगड जिल्हा हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला मानला जातो. याच बाल्लेकिल्ल्यात आता शिवसेना शिंदे गटाकडून राष्ट्रवादीला हादरा देण्यात आला आहे. या पक्ष प्रवेशामुळे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक स्वारज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा सुनील तटकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
हेही वाचा :
किंमत फक्त 55 हजारांपासून सुरु…
चंद्राच्या मंद प्रकाशाला मधुर दुधाची साथ…!
आज कोजागिरी पौर्णिमेचा दिवस राशींसाठी भाग्यशाली; अचानक होणार धनलाभ, आजचे राशीभविष्य