सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने बूट फेकून हल्ला(Justice) करण्याचा प्रयत्न केला. या घटनेच्या निषेधार्थ आज विरोधकांकडून एल्गार पुकारण्यात आला आहे. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. त्यासोबतच मुंबई काँग्रेससह इतर राजकीय पक्षांनी राज्यभरात या घटनेच्या निषेधार्थ विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे रोहित पवारांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. तर दुसरीकडे बारामतीत खासदार सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांनी मूक आंदोलन केले.

छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात या घटनेचा निषेध करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर ही निदर्शने करण्यात आली. ज्यात त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी रोहित पवार यांनी या घटनेचा निषेध करत आपली भूमिका स्पष्ट केली.“काल सरन्यायाधीशांवर जो काही हल्ला झाला त्या हल्ल्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो. (Justice)काल मनुवादी प्रवृत्तीच्या एका व्यक्तीने एका वकिलाने सरन्यायाधीशांवर हल्ला केला. तो एक आरएसएसचा कार्यकर्ता आहे. सरन्यायाधीश हे सर्वसामान्य कुटुंबातील आहे. ते मोठ्या कष्टातून वकिल झाले. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित असलेला एक व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाचा प्रमुख बनतो आणि अशाप्रकारच्या व्यक्तीवर मनुवादी प्रवृत्तीचा व्यक्ती बुट टाकत असेल, मारत असेल ते हे लोकशाहीला घातक आहे”, असे रोहित पवार म्हणाले.
“आम्ही या गोष्टीला विरोध करतो. तसेच निषेधही करतो. लोकशाही टिकली पाहिजे, सर्वसामान्यांचा आवाज टिकला पाहिजे, अशी आमच्या सर्वांची भूमिका आहे.(Justice) पण जातीवादी प्रवृत्तीची लोक मुद्दामून या देशात वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहे. हे मनुवादी प्रवृत्तीची लोक हळूहळू सर्वोच्च न्यायालयातही आपला कंट्रोल असावा, जेणेकरुन येत्या काळात मनुवाद हा देशात परत एकदा आला पाहिजे, असा काहींचा प्रयत्न आहे. याचा विरोध आम्ही सर्वजण करतो”, असेही रोहित पवार यांनी सांगितलेतसेच बारामतीमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मूक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांच्यासह पक्षाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे हे निषेध आंदोलन पार पडले.

तसेच मुंबईतही या घटनेचा निषेध व्यक्त केला जाणार आहे. मुंबई काँग्रेसने या घटनेला अत्यंत धक्कादायक व अस्वस्थ करणारी घटना म्हटले आहे. न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च आसनावर असणाऱ्या व्यक्तीला अशा प्रकारे लक्ष्य करण्याची बाब चीड आणणारी तर आहेच शिवाय संविधानाचा अवमान करणारी आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई काँग्रेसने दिली आहे. (Justice)या घटनेच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसच्या वतीने आज दुपारी वांद्र्यातील जिल्हाधिकारी कार्यालयसमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.
हेही वाचा :
दुर्लक्ष न करता घ्या काळजी….
Renault Triber ची चावी तुमच्या हातात,
आजची आश्विन पौर्णिमा राशींसाठी भाग्याची! लक्ष्मी-गणेशाची मोठी कृपा,