दक्षिण कोरियामध्ये समोर आलेल्या एका खळबळजनक खूनप्रकरणात डिजिटल संभाषणांचा तपासासाठी महत्त्वाचा वापर करण्यात आला आहे. (conversations) आरोपी महिलेच्या मोबाईलमधून मिळालेल्या एआय चॅट प्लॅटफॉर्मवरील शोध इतिहासामुळे तपासाला नवे वळण मिळाले असून, न्यायालयीन प्रक्रियेतही या पुराव्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला हिने झोपेच्या गोळ्या आणि मद्य एकत्र दिल्याचा आरोप आहे. या घटनेत तिघांना औषधांचे मिश्रण देण्यात आले, (conversations) त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर अवस्थेतून बचावला. सुरुवातीला आरोपीने मृत्यू अपघाती असल्याचा दावा केला होता. मात्र तपासादरम्यान तिच्या फोनमधून औषधांच्या परिणामांबाबत आणि धोकादायक प्रमाणाबाबत विचारलेले प्रश्न आढळल्याने संशय अधिक गडद झाला.
तपास यंत्रणांनी सांगितले की, या संभाषणांमुळे आरोपीचा हेतू सिद्ध करण्यास मदत होऊ शकते. पीडितांच्या कुटुंबीयांच्या वकिलांनीही डिजिटल पुरावे आता गुन्हेगारी खटल्यांमध्ये अधिक निर्णायक ठरत असल्याचे म्हटले आहे. दक्षिण कोरियामधील अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये एआय चॅट इतिहासाला महत्त्वाचा पुरावा मानले जाण्याची ही सुरुवातीची उदाहरणांपैकी एक घटना मानली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणानंतर एआय तंत्रज्ञानाच्या वापराबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, एआय साधनांचा गैरवापर रोखण्यासाठी अधिक मजबूत सुरक्षा यंत्रणा, (conversations) धोकादायक प्रश्नांवर मर्यादा आणि जबाबदार वापरासाठी स्पष्ट नियमांची गरज आहे.जगभरात डिजिटल साधने तपास प्रक्रियेत महत्त्वाची ठरत असताना, या खटल्याच्या पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जून महिन्यात होणाऱ्या सुनावणीत न्यायालय या डिजिटल पुराव्याला किती वजन देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा
चाकूहल्ल्यातील जखमी तरुणाचा मृत्यू
महिला की पुरुष? कोणाचे हृदय असते जास्त स्ट्राँग? तज्ज्ञ म्हणतात