मेटा कंपनीने फेसबुक(Facebook) मेसेंजर डेस्कटॉप अॅपसंदर्भातील महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. १५ डिसेंबरपासून Windows आणि Mac यंत्रणांवरील मेसेंजर डेस्कटॉप अॅप बंद केले जाणार आहे. यानंतर युजर्सना हा अॅप वापरता येणार नाही आणि त्यांना थेट फेसबुकच्या वेबसाइटवर रीडायरेक्ट केले जाईल. स्मार्टफोनवरील मेसेंजर अॅप यथावत कार्यरत राहणार आहे, पण लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर युजर्सना वेब ब्राउझरचा वापर करावा लागणार आहे.

मेटा कंपनीने युजर्ससाठी मार्गदर्शनही जाहीर केले आहे. Windows आणि Mac युजर्स आपली जुनी चॅट हिस्ट्री सुरक्षित ठेवण्यासाठी Secure Storage फीचर सक्रिय (Facebook)करू शकतात आणि एक PIN सेट करावा लागेल. यामुळे वेब व्हर्जनवर लॉगिन केल्यावर त्यांची चॅट हिस्ट्री तिथे उपलब्ध राहील.

Secure Storage सुरू करण्यासाठी Settings मध्ये जाऊन Privacy and Safety विभागात End-to-End Encryption पर्याय निवडावा आणि Message Storage वर क्लिक करून ‘Turn On Secure Storage’ फीचर सक्रिय करावे लागेल. या बदलामुळे डेस्कटॉपवर मेसेंजर वापरणाऱ्या युजर्सवर मोठा परिणाम होणार आहे, तर स्मार्टफोन युजर्सवर याचा परिणाम नाही.
हेही वाचा :
शेन वॉटसनने केली मोठी भविष्यवाणी, भारतीय संघाला लागणार मोठा झटका…
इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्कार,कॉलेजच्या बाथरूमध्ये खेचत नेलं नंतर…
पराभव गृहीत धरून, त्याची कारणे शोधली जातात का?