इलेक्ट्रीक कारची(Electric car) सध्या फार चर्चा सुरु आहे. इलेक्ट्रीक कारचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळे प्रदुषणातून धोका टळतो आणि पेट्रोलचा खर्च वाचतो. पण या कारचे काही धोके देखील आहेत. नुकताच सोशल मीडियावर एका इलेकट्रीक कारच्या भीषण अपघाताचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा अपघात इतका भयानक असतो की, यात ड्रायव्हरचं शरीर जळून निघत, त्याला गाडीतून बाहेर निघण्याची संधीच मिळत नाही. या सर्व घटनेचा लाइव्ह थरार आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे आणि तो व्हायरलही होत आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

सदर घटनेमुळे इलेक्ट्रीक वाहनांच्या (Electric car)सुरक्षिततेचा मुद्दा समोर आला आहे. माहितीनुसार, ही इलेक्ट्रीक कार Xiaomi कंपनीची होती. भीषण म्हणजे कारला आग लागल्यानंतर ड्रायव्हरला यातून बाहेर पडता आले नाही ज्यामुळे जळून त्याचा या अपघातात मृत्यू झाला. ही माहिती ‘फ्री प्रेस जर्नल’ने दिली असून हा भयानक अपघात चीनच्या चेंगडू शहरात घडून आला आहे. हा अपघात Xiaomi SU7 कारचा झाला आहे. ही कार आधी एका डिव्हायडरला धडकली. त्यानंतर कारला अचानक आग लागली. आगीमुळे तांत्रिक बिघाड झाला आणि कारचे दरवाजे लॉक झाले, ज्यामुळे कारचालकाला गाडीतून बाहेर पडता आले नाही. वास्तविक लोकांनी कारच्या खिडक्या तोडण्याचा प्रयत्न केला. पण कारचा दरवाजा लॉक झाल्याने या लोकांना चालकाचे प्राण वाचवता आले नाही.

Xiaomi चीनी मोबाईल मॅन्युफॅक्चरनी काही वर्षांपूर्वी आपली ही इलेक्ट्रीक कार बाजारात आणली होती आणि चीनमध्ये या कारची विक्रीही सुरु झाली आहे. गेल्यावर्षी Xiaomi कंपनीने बंगळुरु येथे आयोजित एका मोबाईल ईव्हेंट दरम्यान Xiaomi SU7 कारला प्रदर्शितही केले होते. परंतू भारतात या कारला लाँच करण्यात आलेले नाही. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @ClashReporttr नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले असून एका युजरने लिहिले आहे, “सर्व लोक, तंत्रज्ञानप्रेमी, कृपया अशा नवीन उत्पादनांपासून दूर रहा ज्यांची कठोर चाचणी झालेली नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जो कोणी मूर्ख असेल तोच चायनीज ईव्ही खरेदी करेल”.

हेही वाचा :

मंगलमय दीपोत्सवास प्रारंभ!
हवाई हल्ल्यात तीन क्रिकेटपटूंचा मृत्यू….
एक्सप्रेसला भीषण आग, तीन डब्बे जळून खाक…