वैदिक पंचांगानुसार, आज 20 ऑक्टोबर 2025, आजचा वार (Chaturdashi)सोमवार आहे. आज नरक चतुर्दशी आहे. आजचा हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल?

मेष रास
मेष राशीच्या लोकांनो आज नोकरीमध्ये इतरांना न जमलेले (Chaturdashi)काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील, अटीतटीच्या स्पर्धेतून कलाकारांना त्यांचे नेपुण्य सिद्ध करावे लागेल

वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांनो आज घरामध्ये तुमच्याकडून सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न कराल, परंतु तरीही सर्वांचे समाधान न झाल्याने दुखी व्हाल.

मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांनो आज महिलांनी प्रकृती सांभाळावी. कोणताही निर्णय पटकन न घेणे या स्वभावामुळे इतरांना त्रास होऊ शकतो.

कर्क रास
कर्क राशीच्या लोकांनो आज काहीतरी नवीन शोधण्याचा निर्माण करण्याचा प्रयत्न अवश्य करा. घरातील खर्च वाढण्याची शक्यता आहे

सिंह रास
सिंह राशीच्या लोकांनो आज कामात असणाऱ्यांना तांत्रिक अडथळ्यांमुळे त्यांचे गणित मागेपुढे होण्याची शक्यता आहे

कन्या रास
कन्या राशीच्या लोकांनो आज लांबलेली कामे उरकण्याकरता तुमची घाई असेल, परंतु कोणावरती अति विसंबून राहू नका

तूळ रास
तूळ राशीच्या लोकांनो आज पैशाचे व्यवहार करताना काटेकोरपणा दाखवा, स्पर्धकांच्या हालचालीवर बारीक नजर ठेवणे आवश्यक

वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज तरुणांना प्रिय व्यक्तीच्या सहवासाचे आकर्षण वाटेल, उष्णता आणि पित्ताचे विकार बळवतील

धनु रास
धनु राशीच्या लोकांनो आज महिला काही नवीन बेत आखतील. रेंगाळलेल्या कामातून सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न करा

मकर रास
मकर राशीच्या लोकांनो आज नोकरीमध्ये वरिष्ठ एखादे उद्दिष्ट तुमच्याकडे ठेवतील, त्याची पूर्वतयारी करण्यासाठी जास्त वेळ काढाल

कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांनो आज जेवढा कामासाठी वेळ काढायला तेवढा लाभ मिळेल, तुमचे काही निर्णय इतरांच्या गळी उतरवण्यात यशस्वी व्हाल

मीन रास
मीन राशीच्या लोकांनो आज व्यवसायात उलाढाल थोड्या प्रमाणात वाढेल, ज्यांचा जोडधंदा आहे त्यांनी कामाची घडी नीट बसवून फायदा करून घ्यावा.

हेही वाचा :

आता एकाच दिवसात वटू लागले चेक, नव्या सिस्टिममधील किरकोळ अडचणी झाल्या दूर
100 लोकांनी एकाच वेळी आत्महत्या करण्याची परवानगी मागितली; कारण जाणून धक्का बसेल
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; कृषी विभागाने घेतला मोठा निर्णय