आजच्या महागाईच्या काळात घर खरेदी करणे अनेकांसाठी आव्हानात्मक झाले आहे. अनेक सामान्य नोकरी करणारे नागरिक बँकेकडून गृहकर्ज (home loan)घेऊन आपले स्वप्न पूर्ण करीत आहेत. गृहकर्जासह आर्थिक नियोजन अधिक फायदेशीर बनवण्यासाठी म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याचा मार्ग उपयुक्त ठरतो.

उदाहरणार्थ, जर तुम्ही २० वर्षांच्या कालावधीसाठी ३० लाख रुपयांचे गृहकर्ज ९% व्याजदराने घेतले असेल, तर दरमहा २६,९९२ रुपयांची ईएमआय भरावी लागेल. त्यापैकी सुमारे २५% म्हणजे ६,७५० रुपये मासिक एसआयपीमध्ये गुंतवल्यास, सरासरी १२% वार्षिक परतावा मिळण्याची शक्यता आहे. २० वर्षांनंतर एसआयपीतून मिळणारा(home loan) निधी अंदाजे ६२.०९ लाख रुपये होऊ शकतो, तर गृहकर्जाच्या ईएमआयसह बँकेला परत दिलेली एकूण रक्कम सुमारे ६४.७८ लाख रुपये होते.

अशा प्रकारे, गृहकर्जासह म्युच्युअल फंड एसआयपी सुरू केल्यास तुम्ही कर्ज फक्त परतच करणार नाही तर त्यात गुंतवलेल्या रकमेवरून देखील जवळजवळ समान परतावा मिळवू शकता, ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या हे खूप फायदेशीर ठरते.

हेही वाचा :

टीम इंडियाचा सामना आता फक्त 60 रुपयांत पाहता येणार!
सरकारी गॅरेंटी, एकदा पैसा लावा दर महिन्याला इन्कम मिळणारच…
सलमान खान बलूचिस्तानबद्दल ‘हे’ काय बोलून गेला?