चीनमधील शांघायमध्ये 88 मीटर खोल खाणीत बांधलेलं (Wonderland)इंटरकॉन्टिनेंटल वंडरलँड हे जगातील सर्वात अनोखं “वॉटरफॉल हॉटेल” आहे, जिथे काही मजले पाण्याखाली असून समोर कृत्रिम धबधबा आहे.

“जगभरात अनेक अशा इमारती आहेत ज्या आपल्या विलक्षण आर्किटेक्चरमुळे प्रसिद्ध आहेत. या यादीत चीनमधील एक अद्भुत हॉटेलही समाविष्ट आहे, जे एका जुन्या खाणीत बांधले(Wonderland) गेले आहे आणि त्याला “वॉटरफॉल हॉटेल” म्हणून ओळखले जाते. चला तर जाणून घेऊया या अनोख्या हॉटेलची खासियत काय आहे आणि त्याला हे नाव का दिलं गेलं.

खाणीत उभारलेलं अनोखं हॉटेल

चीनमधील शांघाय शहराच्या सोंगजियांग जिल्ह्यात वसलेले इंटरकॉन्टिनेंटल शांघाय वंडरलँड हॉटेल हे आधुनिक आर्किटेक्चर आणि इंजिनिअरिंगचं उत्कृष्ट उदाहरण आहे. हे हॉटेल एका जुन्या, 88 मीटर खोल खाणीत उभारण्यात आलं आहे. त्यामुळेच याला “क्वारी हॉटेल” किंवा “खाण हॉटेल” असंही म्हटलं जातं.

वॉटरफॉल हॉटेल नाव का पडलं?

या हॉटेलची रचना अत्यंत आकर्षक आहे. 18 मजली या हॉटेलमधील 16 मजले जमिनीखाली, तर दोन मजले पाण्याखाली आहेत. हॉटेलच्या समोर 90 मीटर उंच कृत्रिम धबधबा आहे, जो त्याच्या सौंदर्यात अधिक भर घालतो. या अनोख्या धबधब्यामुळेच या हॉटेलला “वॉटरफॉल हॉटेल” असं नाव मिळालं आहे.

तब्बल ४ हजार कोटींचा प्रोजेक्ट

या ठिकाणाचा इतिहासही मनोरंजक आहे. 1950 च्या दशकात जपान्यांनी या खाणीचा वापर युद्धाच्या काळात बंकरसाठी केला होता. नंतर ती खाण अंशतः पाण्याने भरून एक कृत्रिम तलाव बनवण्यात आली. 2006 साली शांघायमधील एका प्रॉपर्टी ग्रुपने या जागेत हॉटेल उभारण्याची कल्पना केली आणि 2009 मध्ये प्रोजेक्टला सुरुवात झाली. संपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सुमारे ४ हजार कोटी रुपये खर्च झाले.

‘इनवर्टेड ग्राउंडस्क्रेपर’ – खाली बांधलेलं हॉटेल

या हॉटेलच्या डिझाइनसाठी जगातील काही प्रसिद्ध आर्किटेक्चर फर्म्सची निवड करण्यात आली. फेंगशुईच्या तत्त्वांनुसार तयार केलेलं हे हॉटेल वर नव्हे तर खाली बांधलेलं असल्याने त्याला “इनवर्टेड ग्राउंडस्क्रेपर” म्हणतात. वरून पाहिल्यावर या इमारतीचा आकार इंग्रजीतील “S” अक्षरासारखा दिसतो. पर्यावरणपूरक दृष्टिकोनातून हे सिंगल-यूज प्लास्टिक फ्री हॉटेल आहे. तसेच हे एक ‘ब्राउनफिल्ड रिव्हायव्हल प्रोजेक्ट’ आहे — म्हणजेच सोडून दिलेल्या जागेचा नव्याने वापर.

लक्झरी आणि रोमांच यांचा संगम

या हॉटेलमध्ये राहणं म्हणजे केवळ आराम नव्हे, तर एक रोमांचक अनुभवही आहे. येथे क्लिफलगतचे व्हिला, तसेच पाण्याखालील आलिशान सुइट्स आहेत, जिथून पाहुणे काचेच्या भिंतींमधून थेट तलावाचं सुंदर दृश्य पाहू शकतात.हॉटेलमध्ये एकूण ३३७ खोल्या आहेत आणि प्रत्येक रूममध्ये व्हॉइस-कंट्रोल सिस्टम सारख्या आधुनिक सुविधा आहेत.

स्वाद आणि मनोरंजन

खाण्यापिण्यासाठी येथे पाण्याखालील सीफूड रेस्टॉरंट, कँटोनीज फाइन डाइनिंग, आणि क्वारी बार उपलब्ध आहेत. याशिवाय, वॉटर स्पोर्ट्स एरिया, इन्फिनिटी पूल, आणि स्पाची सुविधाही आहे. रोमांचप्रेमींसाठी जवळच असलेल्या थीम पार्कमध्ये झिपलाइन, बंजी जंप, रॉक क्लाइम्बिंग, आणि ग्लास वॉकवे सारख्या साहसी क्रियाही उपलब्ध आहेत.हे हॉटेल म्हणजे आधुनिक आर्किटेक्चर, नैसर्गिक सौंदर्य आणि रोमांच यांचा अप्रतिम संगम आहे — जिथे राहणं म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव!

हेही वाचा :

Toyota Hyryder ची चावी डायरेक्ट तुमच्या खिश्यात!
घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी….! दिवाळीनिमित्त मित्र परिवाराला पाठवा 
आज नरक चतुर्दशीचा दिवस राशींसाठी भाग्याचा! भोलेनाथांकडून सुख-समृद्धीचं वरदान,