दिवाळीमध्ये सर्वच घरात फराळ, रांगोळी इत्यादी अनेक (Diwali)गोष्टी केल्या जातात. दिवाळीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठ्वण्यासाठी काही गोड शुभेच्छा सांगणार आहोत. या शुभेच्छा वाचून तुम्हाला सुद्धा खूप जास्त आनंद होईल.

श्रीकृष्णाने जसा नरकासुराचा केला नाश, तसाच तुमच्या सर्व (Diwali)दु:खांचा होवो नाश; नरक चतुर्दशीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

सत्याचा असत्यावर नेहमीच विजय असावा
अन्यायाचा प्रतिकार करण्याचे बळ आपल्याला लाभो!
ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुख-समृद्धी आणि भरभराटीची जावो
नरक चतुर्दशीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

लक्ष दिव्यांनी उजळली निशा,
घेऊन नवी उमेद नवी आशा,
होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा
नरक चतुर्दशीनिमित्त शुभेच्छा!

चंद्राचा कंदील घरावरी चांदण्यांचे तोरण दारावरी.. क्षितीजाचे रंग रांगोळीवरी दिवाळीचे स्वागत घरोघरी..!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभ दीपावली…

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा, घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

गोवर्धन पूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंद, उत्साह अन हर्षउल्लासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला,
दिवाळीच्या तुम्हांला मनःपूर्वक शुभेच्छा!

घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधुर उटण्याचा..
करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..
दीपावली शुभेच्छा!

गेले काही दिवसांचे
अंधारमय अनुभव पुसून टाका
नवा प्रकाश, नव्या उर्जामय आठवणी घेऊन
ही #दिवाळी साजरा करा…
सर्वांना दिवाळीच्या अनेकानेक शुभेच्छा!!

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही दिशा
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

“सोन्याच्या पावलांनी दीपावली आली, दीपज्योतीच्या तेजातून उमलावी लाली,
कणा रांगोळी ही सजली अंगणी,
गुंफूनी फुले तोरणे बांधू या दारी चिंरजीव असोत हे हर्षभरले दिवस!
तुमच्या जीवनातील त्या दिवसांसाठी लाख लाख शुभेच्छा.”

कंदिलाच्या प्रकाशात उमटलेली प्रत्येक झळाळी, मनात नवी ऊर्जा,
नव्या विश्वासाची भावना निर्माण करो.
ही दिवाळी त्या उजेडात जगण्याची प्रेरणा बनो.”

नक्षत्रांच्या प्रकाशात स्वप्न उगवो, दीपांच्या उजेडात सुख नांदो,
सदिच्छा आणि प्रेम घेऊन येवो हा सण, दिवाळीच्या मंगलमयी शुभेच्छा!”

“सुर्योदयासारखी नवीन आशा, चंद्रप्रकाशासारखी शांतता,
फुलांच्या सुगंधासारखा प्रेम,
सगळ्या कुटुंबासाठी ही दिवाळी घेवो भरभराटीची गोडी!”

धनाची समृद्धी, ज्ञानाचा प्रकाश, सुखाचं स्नान, आरोग्याची लक्ष्मी,
नात्यांचं बंधन आणि प्रेमाची उब हीच खरी दिवाळी तुम्हाला लाभो!”

” धनाची पूजा, यशाचा प्रकाश, सुखाचं अभ्यंगस्नान, समाधानाचा फराळ,
नात्यांचा किल्ला आणि प्रेमाची रोषणाई अशी दिवाळी तुमच्या आयुष्यात दरवळो.”

नवा प्रकाश, नवी सुरुवात, नवी उमेद हीच दिवाळीची खरी ओळख.
जीवनातील प्रत्येक अंधार मागे सारून या सणाने तुमच्या मनात आनंद,
आत्मविश्वास आणि यशाची ज्योत पेटवो.
तुमचं आयुष्य दिव्यांच्या तेजाने नव्या स्वप्नांनी उजळो दे. शुभ दीपावली!”

दिवाळी म्हणजे नवी ऊर्जा, नवी प्रेरणा, आणि नव्या शक्यतांचा आरंभ.
या प्रकाशोत्सवाने तुमच्या जीवनात सकारात्मकतेचा प्रकाश फुलू दे,
ज्याने प्रत्येक दिवस उत्साहाने आणि आनंदाने भरलेला असेल. मनःपूर्वक शुभ दीपावली!

रांगोळीचे रंग आपल्याला शिकवतात प्रत्येक छटा वेगळी असली तरी एकत्र आली की चित्र सुंदर होतं.
तसंच जीवनात प्रत्येक नातं, प्रत्येक अनुभव महत्त्वाचा असतो.
या दिवाळीत त्या सगळ्या रंगांनी तुमचं आयुष्य सजो. शुभ दीपावली!”

दीपांच्या रोषणाईत उधळू आनंद,
फटाक्यांच्या आवाजात भरून जावो आसमंत,
घरभर प्रेम आणि समाधान नांदो, दिवाळीच्या शुभेच्छा सर्वांना!

फटाक्यांची गजर, विजेची चमक,
सजावट, उटण्याची आंघोळ,
रांगोळीची रंगत, फराळाची गोडी, लक्ष्मीची पूजा,
भाऊबीजेची ओढ दिवाळीचा सण खूपच आनंददायी!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

सुर्योदयासारखी नवीन आशा, चंद्रप्रकाशासारखी शांतता,
फुलांच्या सुगंधासारखा प्रेम, सगळ्या कुटुंबासाठी ही दिवाळी घेवो भरभराटीची गोडी!

हेही वाचा :

आता एकाच दिवसात वटू लागले चेक, नव्या सिस्टिममधील किरकोळ अडचणी झाल्या दूर
100 लोकांनी एकाच वेळी आत्महत्या करण्याची परवानगी मागितली; कारण जाणून धक्का बसेल
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; कृषी विभागाने घेतला मोठा निर्णय