प्रत्येकजण आपापल्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात.(pension)एलआयसीच्या जीवन शांती योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. या योजनेत तुम्हाला मॅच्युरिटीनंतर १ लाखांची पेन्शन मिळते. एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. या कंपनीतील योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. एलआयसी जीवन शांती हा सिंगल प्रिमियम प्लान आहे.

एलआयसीच्या या योजनेत तुम्ही पगारातील ठरावीक रक्कम गुंतवायची आहे. यातून येणाऱ्या परताव्यातून तुम्हाला पेन्शन मिळणार आहे. यामुळे सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला आर्थिक अडचण भासणार नाही.(pension)या योजनेत तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक करायची आहे. यानंतर तुम्हाला गॅरंटीड पेन्शन मिळणार आहेएलआयसीच्या पॉलिसीत ३० ते ७९ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या योजनेत कोणताही रिस्क कव्हर नाहीये.

परंतु या योजनेत अनेक फायदे मिळतात. (pension)एलआयसीच्या या योजनेत तुम्हाला गुंतवणूकीसाठी दोन ऑप्शन मिळतात. एक म्हणजे डेफर्ड अॅन्युटी फॉर सिंगल लाइफ आणि दुसरा म्हणजे अॅन्युटी फॉर जॉइंट लाइफ.एलआयसीच्या न्यू जीवन शांती स्किममध्ये तुम्ही पेन्शनची लिमिट ठरवू शकतात. या योजनेत तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळते. जर कोणताही ५५ वर्षीय व्यक्ती ११ लाख रुपये जमा करत असेल आणि पाच वर्षांसाठी गुंतवणूक करत असेल तर तुम्हाला वर्षाला १,०१,८८० रुपये पेन्शन मिळणार आहे. म्हणजे महिन्याला तुम्हाला ८,१४९ रुपये मिळणार आहे.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज; ऑक्टोबरचा हप्त्या ‘या’ दिवशी जमा होणार
सणासुदीच्या काळात ‘या’ ब्रँडच्या गाड्यांचा विक्रमी रेकॉर्ड; ४ लाखांहून अधिक गाड्या विकल्या