कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
बारामती, पुणे नंतर शरद पवार यांचं कोल्हापूरवर विशेष प्रेम.(moving)इथल्या सर्वसामान्य जनतेने त्यांना आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला भरभरून समर्थन दिलं. पण आता हेच कोल्हापूर त्यांच्यापासून हळूहळू दूर होताना दिसते आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांना सर्वच ठिकाणी स्थान मिळालेले नाही. जिल्ह्यात आठ ठिकाणी त्यांची तुतारी दिसणार नाही, उर्वरित ठिकाणी ती वाजेल का हे दिनांक 3 डिसेंबर रोजी समजणार आहे. शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्या विदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेसचा हात सोडला आणि इसवी सन 1999 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. तेव्हा त्यांना पश्चिम महाराष्ट्रातून जोरदार समर्थन मिळालं.

पण तरीही त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा साडेतीन जिल्ह्यापुरता मर्यादित असल्याची टीका केली जात होती. राजकीय विश्लेषकही त्याच पद्धतीने मांडणी करत होते.50 ते 55 आमदार आणि सात ते आठ खासदार निवडून आणण्याची क्षमता शरद पवार यांच्याकडे होती. जय ललिता, मायावती, ममता बॅनर्जी यांना त्यांच्या राज्यात एक हाती सत्ता जशी मिळाली तशी एक हाती सत्ता शरद पवार यांना महाराष्ट्रात मिळवता आली नाही हे वास्तव आहे.(moving)एक काळ असा होता की कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस जिंकत होती शिवाय जिल्ह्यात चार ते पाच आमदार निवडून येत होते.
जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हा बँक, गोकुळ दूध संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणच्या सत्तेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भागीदारी होती. (moving)कोल्हापूर हे त्यांच आजोळ. पन्हाळा तालुक्यात त्यांच्या मामाच गाव. त्यांचे इतर प्रमुख नातेवाईकही कोल्हापुरातले. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात त्यांना मानणारा एक मोठा वर्ग होता आणि आहे. अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाळी केल्यानंतर शरद पवार यांचे राजकारण खूप मागे गेले आहे.
त्यांच्या शिल्लक आणि उरल्या सुरल्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यात भारतीय जनता पक्षाला वगळून कोणाशीही युती करावी, आघाडी करावी अशी त्यांनी भूमिका जाहीर केली. पण त्यांचे दुर्दैव असे की जयसिंगपूर नगरपालिकेत त्यांचा गट भाजपसोबत गेला आहे. (moving)कागल, मुरगुड, पेठ वडगाव, हुपरी, पन्हाळा, मलकापूर, गडहिंग्लज येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी नाही. शिरोळ, कुरुंदवाड, आजरा, चंदगडआणि हातकणंगले येथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी दिसणार आहे. पण ती वाजणार आहे का हे मतमोजणीच्या वेळीच करणार आहे.

लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांना काँग्रेसच्या श्रीमंत शाहू छत्रपती यांचा प्रचार करावा लागला.(moving) विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार निवडून आला नाही. कागल विधानसभा मतदारसंघ हा त्यांनी प्रतिष्ठेचा केला होता. त्यांची तुतारी घेऊन समरजीत सिंह घाटगे हे हसन मुश्रीफ यांच्या विरोधात उभा होते. पण घाटगे यांना अपयश आले आणि आता तर त्यांनी मुश्रीफ यांच्याशीच राजकीय साटे लोटे केले आहे. एकूणच शरद पवार यांच्यापासून कोल्हापूर हळूहळू दूर जात आहे हे मात्र निश्चित.
हेही वाचा :
हिवाळ्यात गुलाबाच्या रोपट्याला फुले येत नाहीत? या ट्रिक जाणून घ्या
‘या’ तारखेपासून राज्यातील ६०० शाळा बंद! फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
लग्नातच स्मृतीने पलाशला रंगेहाथ पकडलं? बॉलिवूड अभिनेत्याच्या नव्या दाव्याने खळबळ!