शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एसटी प्रवासातील अडचणी एका फोनद्वारे सोडवता याव्यात,(students)यासाठी राज्य परिवहन एसटी महामंडळाने स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाने विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला आहे. हा क्रमांक बातमीत देण्यात आला आहे.पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत राज्य सरकार एसटीच्या माध्यमाने शालेय विद्यार्थ्यांना घर ते शाळा ये-जा करण्यासाठी मासिक पासात सुमारे ६७ टक्के सवलत देते. मात्र, अनेकदा एसटी फेऱ्यांची वानवा, बस वेळेत न येणे, बस रद्द असणे यांमुळे विद्यार्थ्यांना पायपीट करत किंवा अन्य पर्यायाने शाळा गाठावी लागते. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सोलापूर दौऱ्यात शालेय विद्यार्थिनींनी एसटीच्या फेऱ्यांचा गोंधळ त्यांच्यासमोर मांडला होता.

शालेय बस वेळेवर न सुटणे, बसकडून शाळेचा थांबा चुकवणे, (students)बसगाड्या अचानक रद्द करणे यांसह शालेय प्रवासातील तक्रार विद्यार्थ्यांना करता यावी, यासाठी एसटी महामंडळाने हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. राज्यातील ३१ विभागांतील सर्व विभाग नियंत्रकांचे दूरध्वनी क्रमांक संबंधित शाळा आणि महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. आपत्कालीन स्थितीत शाळा-महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक आणि विद्यार्थी यांनी थेट संपर्क साधून अडचणी आणि समस्या सोडवणे शक्य होणार आहे. एसटी विद्यार्थी हेल्पलाइन क्रमांक सर्व एसटी बस स्थानक आणि आगारात लावण्यात येणार असून, विद्यार्थ्यांनी संपर्क साधण्याचे महामंडळाने आवाहन केले आहे.
मदतीसाठी पुढील क्रमांकाची घोषणा- १८००२२१२५१

एसटी फेऱ्यांच्या गैरव्यवस्थापनामुळे जितके दिवस विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल (students)तितके दिवस संबंधित एसटी अधिकाऱ्यांचे निलंबन करा, अशा सूचना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या वाहतूक विभागाला दिल्या आहेत.
आगार व्यवस्थापक आणि पर्यवेक्षक यांनी सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ५-६ वाजता मुख्य बसस्थानक आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असलेल्या ठिकाणी गणवेशात उपस्थित राहावे. शालेय बस फेऱ्यांच्या गैरव्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास तितक्या दिवसांचे निलंबन किंवा सक्तीच्या रजेवर एसटी अधिकाऱ्यांना पाठवावे. विद्यार्थी-विद्यार्थीनींसह शाळा-महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांनी तक्रार आल्यास संबंधित पर्यवेक्षक, आगार व्यवस्थापक आणि संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे, अशा सूचना परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी महामंडळाच्या वाहतूक महाव्यवस्थापकांना दिल्या आहेत.
हेही वाचा :
‘मी लग्न करायला तयार, पण फक्त मुलगी….’, युजवेंद्र चहल पुन्हा बोहल्यावर चढायला तयार
एका प्रेमीसाठी 5 मुलींमध्ये झाली हाणामारी! कपडे खेचले, झिंज्या उपटल्या अन्… Video Viral
हृदय हेलावणारी घटना, 20 चिमुकल्यांना अंगणवाडीत कोंडून ठेवलं; आक्रोश कॅमेऱ्यात कैद!