कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

“पाकिस्तान तहरीक ए इन्साफ”पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी पंतप्रधान (chairman)इम्रान खान यांचा तुरुंगामध्ये मृत्यू झाला असल्याचे वृत्त अफगाणिस्तान मधील मीडियाने दिल्यानंतर जगभर खळबळ उडाली. पाकिस्तानमध्ये इम्रान समर्थक रस्त्यावर उतरले.आता तिथे केव्हाही सर्व सूत्रे फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्या हाती जातील. कारण शहाबाज शरीफ यांनी संसदेमध्ये 27 वी घटनादुरुस्ती केल्यामुळे त्यांनी स्वतःच्या हातानेच लोकशाहीची कबर खोदली आहे असे म्हणता येईल. सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संघर्ष सुरू आहे.

अफगाणिस्तान मधील मीडियां ने इम्रान खान याची पाकिस्तान (chairman)मधील तुरुंगामध्ये हत्या करण्यात आली असल्याचे वृत्त दिले होते.हा पाकिस्तान मधील इंसाफ पार्टीच्या कार्यकर्त्यांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न होता. मृत्यूची खबर दिल्यामुळे पाकिस्तान मधील तेहरिक ए इंसाफ पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील आणि तेथे यादवी होईल. शरीफ सरकार अडचणीत येईल असे नियोजन या वृत्तामागे होते. त्यामध्ये तालिबानी सरकारला थोड्याफार प्रमाणात यश आले आहे असे म्हणता येईल. इम्रान खानला सत्तेतून बाहेर ठेवायचे, शहाबाज शरीफ यांना पंतप्रधान करायचे आणि अप्रत्यक्षपणे सूत्रे आपल्या हाती ठेवायची

ही खेळी असीम मुनीर यांनी केली होती. शरीफ सरकारला इम्रान खान यांची (chairman)अडचण होऊ शकते म्हणून त्यांना कथित भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगात डांबले.त्यांना जन्मठेपेची शिक्षाही सुनावली. तर दुसरीकडे शरीफ सरकारला धाक दाखवून मुनीर यांनी स्वतःवर फिल्ड मार्शलचा अभिषेक करून घेतला. अमर्याद अधिकार हातात येण्यासाठी शरीफ सरकारला 27 वी घटनादुरुस्ती करायला भाग पाडले. यामुळे पंतप्रधानापेक्षाही ज्यादा अधिकार मुनीर यांना मिळाले आहेत. आता या जादाच्या अधिकाराच्या दबावाखाली मुनीर हे शरीफ यांना केव्हाही सत्ताबाह्य करू शकतात. आणि सध्या तसे वातावरण पाकिस्तान मध्ये तयार झाले आहे.

पाकिस्तानच्या स्थापनेपासून तेथे लोकशाही रुजली नाही. (chairman)बहुतांश कालावधी हा हुकूमशहाच्या हाती गेला होता. जी काही सरकारी तगली होती ती लष्करशहाच्या आशीर्वादामुळे. आता तेथील जनतेलाही लष्करी राजवट अंगवळणी पडली आहे.
घटना दुरुस्ती केली जात होती तेव्हा इमरान खानच्या पक्षाचे कार्यकर्ते विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. पण त्यांचा विरोध डाउनलोड संसदेने घटनादुरुस्ती केली. या घटना दुरुस्तीमुळे सर्व अधिकार लष्कराकडे जाणार आहेत हे माहीत असूनही शरीफ सरकारने आपले सिंहासन टिकवण्यासाठी घटना दुरुस्ती करून लोकशाहीची कबर खोदून ठेवली आहे.

फिल्ड मार्शल असीम मुनीर यांना सर्वाधिक धोका आहे तो इम्रान खानचा(chairman) तो तुरुंगात असूनही पाकिस्तान मध्ये यादवी निर्माण करू शकतो. म्हणून त्याला तुरुंगात एकाकी अवस्थेत ठेवले आहे.त्याला कोणीही अगदी त्याच्या कुटुंबातील लोक सुद्धा भेटू शकत नाहीत. जवळपास तीन आठवडे इमरानला त्याच्या कुटुंबीयांनी पाहिलेले नाही. त्यातच त्याची हत्या झाल्याची बातमी पसरल्यामुळे इम्रानचे कुटुंबीय आणि त्याच्या पक्षाचे कार्यकर्ते बिथरले आहेत. या बिथरलेल्या कार्यकर्त्यांकडून पाकिस्तानच्या लष्करशहांना अर्थात फिल्ड मार्शल मुनीर यांना कळवा विरोध होऊ शकतो. हे ओळखूनच मुनीर यांनी इमरान खान यांनी देश सोडायची तयारी दर्शवली तर तुरुंगातून मुक्त केले जाईल अशी अट मुनीर यांनी घातली असल्याचे वृत्त आहे.

स्वतःचा जीव वाचवण्यासाठी इम्रान खान यांनी ही (chairman)अट मान्य केली तर मुनीर हे पंतप्रधान शरीफ यांना सत्ताबाह्य करतील आणि स्वतः हुकूमशहा बनतील. संयुक्त राष्ट्र संघाचे मानवाधिकार प्रमुख बो बोल्कर टर्क यांनी अशाच प्रकारची भीती व्यक्त केली आहे.टर्क यांनी पाकिस्तान मधील घटना दुरुस्तीला आक्षेप घेतला आहे. या घटना दुरुस्ती मुळे पाकिस्तानमधील उरली सुरली लोकशाही धोक्यात येणार आहे किंवा आलीच आहे. सामान्य लोकांच्या अधिकारावर गंडांतर आलेले आहे. शहाबाज शरीफ यांचे सरकार कठपुतली बाहुली बनले आहे किंवा बनणार आहे. पाकिस्तानची सूत्रे मुनीर यांच्या हातात जायला पाहिजेत, तसे झाले तर मुनीर यांना आपल्याला हवे तसे वाकवता येईल. आणि म्हणूनच अमेरिकेच्या इशाऱ्यावरून तेथे घटनादुरुस्ती झाली आहे असे म्हणण्यास बराचसा वाव आहे.

हेही वाचा :

गृहकर्ज घेतल्यानंतर क्रेडिट स्कोअर वाढला, बँका कर्जाचे व्याजदर कमी करतील, जाणून घ्या

कार मॉडिफाय करण्याआधी वाचा ‘हे’ नियम; अन्यथा लायसन्स होईल रद्द

‘ऐश्वर्याला मुस्लिम बनवून लग्न करणार!’, पाकिस्तानातून मौलानाचा मोठा दावा