कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
देशातील,महाराष्ट्रातील साधुसंतांनी विशेषतः संत तुकाराम यांनी (environment)उत्तम पर्यावरणासाठी वृक्षवल्लीचे महत्व विशद केले आहे. तथापि सत्ताधाऱ्यांच्याकडून त्याचा बोध घेतला जात नाही. असे असते तर नाशिक येथील तपोवन परिसरातील वृक्षवल्लींवर कुऱ्हाड चालवण्याचा निर्णय घेतला नसता. आता या निर्णयाविरुद्ध पर्यावरणवादी एकवटले आहेत. एकाही झाडाला हात लावून दिला जाणार नाही असा इशारा त्यांनी विद्यमान सरकारला दिला आहे. नाशिक येथील तपोवन परिसरात असलेली सुमारे1700 झाडे मुळापासून तोडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे कारण कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक येथे येणाऱ्या देशभरातील संत महंतांचीनिवासाची व्यवस्था तेथे केली जाणार आहे. वास्तविक हे संत महंत कायमसाठी राहण्यास नाशिक मध्ये येणार नाहीत. कुंभमेळा संपल्यानंतर ते माघारी परतणार आहेत. म्हणजे काही दिवसच त्यांचे वास्तव्य असणार आहे. मग त्यासाठी झाडांची कत्तल कशासाठी? त्यांच्या निवासाची व्यवस्था अन्यत्र कुठेही केली जाऊ शकते किंवा तसे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यावर शासनाने विचार केला पाहिजे.

मंत्री गिरीश महाजन यांनी या वृक्ष कत्तलीचे समर्थन केले आहे. (environment)तपोवन परिसरात असलेली ही झाडे वीस वर्षांपूर्वी लावण्यात आलेली आहेत. ती काही जुनाट नाहीत. ही झाडे काढून टाकताना नव्या ठिकाणी वृक्षारोपण केले जाणार आहे. एक झाड काढले तर दहा वृक्ष लावले जाणार आहेत हा महाजन यांचा युक्तिवाद पटणारा नाही. कारण ही झाडे वीस वर्षांची असली तरी ती जगवण्यात आलेली आहेत. त्यासाठी कुणाचे तरी श्रम वापरले गेले आहेत.स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या काही वर्षात विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल केली जात होती. केंद्र शासनाच्या परवानगीने हा वृक्ष संहार चालू होता. त्यावेळी पर्यावरणवादी बहुगुणा यांनी चिपको आंदोलन सुरू केले होते.
हे चिपको आंदोलन देशभर गाजत होते आणि त्यामुळे करोडो झाडांची कत्तल थांबली होती. (environment)अशाच प्रकारचे चिपको आंदोलन नाशिक येथे सुद्धा केले जाईल असा इशारा निसर्गप्रेमी आणि वृक्षप्रेमी चित्रपट कलावंत सयाजी शिंदे यांनी त्यांच्या संस्थेच्या वतीने राज्य शासनाला दिला आहे. तपोवन मधील एकाही झाडाला आम्ही हात लावू देणार नाही. तपोवन मधील प्रत्येक झाडाला वाचवण्यासाठी शेकडो कार्यकर्ते तेथे जाणार आहेत. गेल्या वीस वर्षात विकासाच्या नावाखाली, अनेक प्रकल्पांसाठी करोडो वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. त्याचे परिणाम आता उत्तर भारतात भूस्खलनाच्या माध्यमातून दिसू लागले आहेत.
काही दिवस मुक्कामासाठी नाशिकमध्ये येणाऱ्या संताने(environment) महंत यांच्यासाठी झाडांची कत्तल करून हंगामी स्वरूपाची निवास व्यवस्था केली जाण्याचा विचार म्हणजे वैचारिक दारिद्र्य आहे असे म्हणावे लागेल. संत तुकाराम यांनी निसर्गाला सर्वाधिक महत्त्व देताना वृक्ष आणि वल्ली हे आमचे सगे सोयरे आहेत असे म्हटले आहे. तुकोबारायांच्या या रचनेला आपण तिलांजली देणार आहोत का? निसर्गाचा ऱ्हास करणार आहोत का? तसे असेल तर मग”झाडे लावा, झाडे जगवा”,”एक मुल एक झाड”हे अभियान का चालवायचे? या प्रश्नाचे उत्तर तपोवन वर कुऱ्हाड चालवण्याआधी संबंधितांनी दिले पाहिजे.

सयाजी शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेली भूमिका अतिशय योग्य आहे.(environment)विकास कामासाठी झाडांची कत्तल करताना ठेकेदाराने एक झाड तोडले तर दहा वृक्षरोपण केले पाहिजे अशी अट न्यायालयानेच घातलेली आहे. तसेच शपथपत्र दिले जाते मात्र एक झाड तोडताना दहा झाडे लावली आहेत याची खातरजमा कुणी करताय का? या प्रश्नाचे उत्तरही समाधानकारक मिळत नाही. कारण दहा झाडे लावली आहेत पण ते कागदावर आहेत हेच आजचे वास्तव आहे.
हेही वाचा :
गृहकर्ज घेतल्यानंतर क्रेडिट स्कोअर वाढला, बँका कर्जाचे व्याजदर कमी करतील, जाणून घ्या
कार मॉडिफाय करण्याआधी वाचा ‘हे’ नियम; अन्यथा लायसन्स होईल रद्द
‘ऐश्वर्याला मुस्लिम बनवून लग्न करणार!’, पाकिस्तानातून मौलानाचा मोठा दावा