कोल्हापुरातून खळबळजनक बातमी उघडकीस आली आहे.(pillar)विश्वपंढरी ते हॉकी स्टेडियम रोड येथे मध्यरात्री तरुणाची हत्या करण्यात आली. रस्त्यालगत असलेल्या खांबाला बांधलेल्या अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळून आला. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या पोलिसांकडून मृत तरूणाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्व पंढरी ते हॉकी स्टेडियमदरम्यानच्या रस्त्यालगत एका खांबाला बांधलेल्या अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळला. मध्यरात्रीच्या सुमारास ३० ते ३५ वयोगटातील तरूणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉकी स्टेडियमच्या (pillar)दिशेनं जाणाऱ्या मार्गावरील एका खांबाला टेकून एक तरूण बसला असल्याचं नागरिकांच्या निदर्शनास आले.परिसरातील नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले. तेव्हा तरूणाच्या गळ्याभोवती वायर गुंडाळलेली दिसली. तसेच तो मृत अवस्थेत असल्याचं आढळून आलं. प्रत्यक्षदर्शींनी तातडीनी याबाबतची माहिती राजवाडा पोलीस ठाण्यात दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किरण लोंढे आणि डीबी पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला तसेच रूग्णालयात पाठवले. (pillar)पोलिसांनी मृतदेहाजवळ काही पुरावे आहेत का? याचा शोध घेतला. मात्र, पोलिसांना मृतदेहाजवळ ना फोन ना कोणती कागदपत्रे सापडली. सध्या पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. हा तरूण नेमका कोण आहे? तरूणाची निर्घृण हत्या का करण्यात आली? हत्या करण्यामागचं कारण काय? तरूणाला खांबाला बांधून का ठेवलं? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
हेही वाचा :
गृहकर्ज घेतल्यानंतर क्रेडिट स्कोअर वाढला, बँका कर्जाचे व्याजदर कमी करतील, जाणून घ्या
कार मॉडिफाय करण्याआधी वाचा ‘हे’ नियम; अन्यथा लायसन्स होईल रद्द
‘ऐश्वर्याला मुस्लिम बनवून लग्न करणार!’, पाकिस्तानातून मौलानाचा मोठा दावा