राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे.(directly)काही ठिकाणी मांडीला मांडी लावून बसणारे महायुतीतील नेते मंडळी स्थानिक पातळीवर मात्र आपल्याच विजयासाठी मेहनत घेताना पाहायला मिळत आहेत. तर काही ठिकाणी अगदी शांततेत निवडणुका पार पडल्या आहेत. अशातच एका तरुण मतदाराने अगदी सात समुद्र पार करून ऑस्ट्रेलिया मधून येऊन शिराळा येथे मतदानाचा हक्क बजावला.

मूळचा महाराष्ट्राच्या मातीतला अन्सार कासिम मुल्ला हा तरुण ऑस्ट्रेलियातील मेलबॉर्न मध्ये नोकरीला आहे. (directly)दोन डिसेंबर रोजी शिराळा नगरपंचायतीसाठी मतदान होणार असल्याचं कळतच अन्सार याने थेट विमानाने प्रवास करत शिराळामध्ये दाखल झाला. मतदानासाठी आपला मित्र आल्याचे कळताच त्याच्या मित्रांनी फटाक्यांचं आतिषबाजी करत स्वागत केले. त्यानंतर अन्सारने मतदानाचा पवित्र हक्क बजावला.

यानिमित्ताने शिराळा तहसीलदार शामला खोत यांनी त्यांचा सत्कार यावेळी केला. (directly)या तरुणाला मतदानाला येण्यासाठी मेलबॉर्न ऑस्ट्रेलिया ते शिराळामध्ये येण्यासाठी दीड लाख रुपये ट्रॅव्हलिंग खर्च आला असल्याचे त्याने सांगितले. एवढा खर्च करून फक्त मतदानाचा हक्क बजावण्यासाठी चक्क सात समुद्र पार करत तरुण सांगलीच्या शिराळामध्ये दाखल झाला.मतदान हे श्रेष्ठ दान असल्याचं सांगत मतदानाचा हक्क बजावला आहे.मतदान करण्यासाठी थेट ऑस्ट्रेलिया मधून हजारो किलोमीटरचा प्रवास करत दाखल होऊन शिराळा नगरपंचायतीसाठी मतदान केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान आता या निवडणुकांच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
गृहकर्ज घेतल्यानंतर क्रेडिट स्कोअर वाढला, बँका कर्जाचे व्याजदर कमी करतील, जाणून घ्या
कार मॉडिफाय करण्याआधी वाचा ‘हे’ नियम; अन्यथा लायसन्स होईल रद्द
‘ऐश्वर्याला मुस्लिम बनवून लग्न करणार!’, पाकिस्तानातून मौलानाचा मोठा दावाEditEditEdit