हे. काही दिवसांपूर्वीच एका चिमुकलीवर अत्याचार करून तिची (forced)हत्या केल्याची घटना ताजी असतानाच, आता मालेगाव परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नराधमाला पोलिसांनी तत्काळ बेड्या ठोकल्या आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव परिसरात एका ५४ वर्षीय व्यक्तीने १४ वर्षीय पीडित मुलीला रस्त्यात गाठले. आरोपीने मुलीला फूस लावत तिला आपल्या दुचाकीवर बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने विरोध करताच, त्याने तिला बळजबरीने गाडीवर बसवले.

त्यानंतर दुचाकी सुसाट वेगाने गिरणा धरणाकडे पळवत नेली.(forced) धरणावर नेऊन त्याने त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.अत्याचारादरम्यान पीडित मुलीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. मुलीचा आवाज ऐकून जवळच असलेल्या स्थानिक गावकऱ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी तातडीने आवाजाच्या दिशेने धाव घेतली. गावकऱ्यांनी घटनास्थळी पोहोचताच आरोपीला रंगेहाथ पकडले आणि नराधमाच्या तावडीतून त्या अल्पवयीन मुलीची सुटका केली.

गावकऱ्यांनी घडलेला संपूर्ण प्रकार तातडीने पोलिसांना कळवला. (forced)घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याला बेड्या ठोकल्या. पीडित मुलीला पुढील उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पोलिसांनी या ५४ वर्षीय आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे मालेगावात मुलींच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पालकवर्गातून आणि नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

हेही वाचा :

गृहकर्ज घेतल्यानंतर क्रेडिट स्कोअर वाढला, बँका कर्जाचे व्याजदर कमी करतील, जाणून घ्या

कार मॉडिफाय करण्याआधी वाचा ‘हे’ नियम; अन्यथा लायसन्स होईल रद्द

‘ऐश्वर्याला मुस्लिम बनवून लग्न करणार!’, पाकिस्तानातून मौलानाचा मोठा दावाEditEditEdit