कार्यशाळेचा दीपप्रज्वलनाने शुभारंभ करताना ज्योती चौगुले, प्रशांत भोसले, फैयाज गैबान, नितीन धुत, राजेंद्र शिंत्रे, शितल काजवे आदी मान्यवर
इचलकरंजी –
बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटर यांच्या वतीने (Builders)आणि इचलकरंजी हार्डवेअर एमवायके डिलर यांच्या सहकार्याने बांधकाम व्यावसायिकांसाठी अत्यंत महत्त्वापूर्ण असलेल्या रियल इस्टेट रेरा याविषयावरील कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. यामध्ये प्रमुख मार्गदर्शक गृहनिर्माण आणि रेरा समिती अध्यक्ष ज्योती चौगुले पूना आणि इचलकरंजी महानगरपालिकेचे नगर रचनाकार प्रशांत भोसले यांनी सहज व सोप्या भाषेत विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

कार्यशाळेचा शुभारंभ आर्किटेक्ट ज्योती चौगुले आणि नगर रचनाकार प्रशांत भोसले (Builders)आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.प्रमुख मार्गदर्शक आर्किटेक्ट ज्योती चौगुले यांनी, रेरा कायद्याबाबत सविस्तर माहिती देताना कायद्यातील किचकट बाबी बाजूला ठेवत, रेराबाबत अत्यंत साध्या व सोप्या शब्दांत मार्गदर्शन केले. महानगरपालिकेचे नगर रचनाकार प्रशांत भोसले यांनी, नगर रचना आणि बांधकामासंबंधीच्या नियमांबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले.स्वागत इचलकरंजी बिल्डर्स असोशिएशन इचलकरंजी सेंटर चेअरमन फैयाज गैबान यांनी केले. प्रास्ताविक ट्रस्ट चेअरमन नितीन धूत यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुर शहा यांनी केले. (Builders)यावेळी आर्किटेक्ट ज्योती चौगुले यांनी उपस्थित बांधकाम व्यावसायिकांशी संवाद साधताना बिल्डर्सच्या रेराबाबतच्या विविध अडचणी आणि शंका या संदर्भात सखोल माहिती देत त्यांचे समाधान केले. त्यामुळे उपस्थित व्यावसायिकांना रेरा कायद्याचे पालन करताना येणाऱ्या अडचणी दूर होण्यासाठी मोठी मदत मिळाली. या कार्यशाळेच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांना रेरा कायद्याचे सखोल ज्ञान मिळाले. सर्वच बिल्डर्सनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेंद्र शिंत्रे, शितल काजवे व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
हेही वाचा :
शेतकरी बांधवांनो, ‘ही’ अट पूर्ण करा, अन्यथा कर्जमाफी मिळणार नाही!
सूर्यकुमार यादवकडून कर्णधारपद काढा, स्टार क्रिकेटरचं धक्कादायक विधान
१ जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग लागू होणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट