इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय (Corporation)वातावरणात नव्या घडामोडींनी चांगलीच रंगत आणली आहे. विविध सामाजिक मुद्द्यांवर सातत्याने कार्यरत असलेली “इचलकरंजी नागरिक मंच” ही सामाजिक संघटना आता प्रथमच निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत असून काही प्रभागांत स्वतःचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय तर काही ठिकाणी पक्ष गट तट न बघता चांगल्या उमेदवारांचे समर्थन इचलकरंजी नागरिक मंच करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.संघटनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत उमेदवारांना पाठिंबा देणे,चांगल्या उमेदवारांचे समर्थन करणे याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे वृत्त स्मार्ट इचलकरंजीच्या हाती लागले आहे.

इचलकरंजी नागरिक मंच ही पूर्णपणे सामाजिक कार्यावर (Corporation)आधारित संघटना असून रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, आरोग्य सुविधा आणि नागरिकांच्या मूलभूत समस्यांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. राजकीय पक्षांपासून दूर राहून समाजहिताच्या मुद्द्यांवर काम करणारी ही संघटना नागरिकांमध्ये स्वतंत्र, विश्वासार्ह आणि पर्यायी नेतृत्व म्हणून उदयास येत आहे.याच पार्श्वभूमीवर मंचातील सक्रिय, कर्तबगार आणि नागरिकांमध्ये लोकप्रिय असलेल्या सदस्यांना उमेदवार म्हणून उभे करण्याची तयारी संघटनाकडून सुरू आहे. नागरिक मंचाच्या वतीने असे सांगितले जात आहे की शहरातील समस्यांची सखोल जाण, लोकांशी असलेला संपर्क आणि समाजकार्यातील सातत्य पाहता योग्य उमेदवार इनाम देऊ शकतात.

राजकारणात चाललेला पैशाचा बाजार व आर्थिक उलाढाल त्यातून (Corporation)होणारा भ्रष्टाचार यामुळे सुशिक्षित नागरिक या प्रक्रियेपासून दूर जात असून त्याना प्रवाहात आणणे हे नागरिक मंचाच्या निर्णयामुळे सुलभ होणार असून संघटनेच्या प्रवेशामुळे निवडणुकीतील समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.इचलकरंजी नागरिक मंच लवकरच अधिकृत उमेदवार यादी आणि प्रचाराची रणनीती जाहीर करणार असून, नागरिकांच्या हितासाठी स्वच्छ आणि जबाबदार नेतृत्व उभे करण्याचा त्यांचा निर्धार अधोरेखित केला जात आहे.या घडामोडींमुळे इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक यंदा अधिकच उत्साहवर्धक आणि स्पर्धात्मक ठरणार आहे.
हेही वाचा :
आज 12 तारीख आणि डिसेंबर महिना, ‘हा’ दिवस भाग्यवान का मानला जातो? जाणून घ्या
LIC ची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् दर महिन्याला १२००० रुपयांची पेन्शन मिळवा
“महिलांनी झोपण्यापूर्वी टाळावीत ही ५ धोकादायक सवयी; आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम”