बनावट दारू निर्मिती करून त्याची वाहतूक करणाऱ्या संशयित(liquor)मुसा अब्दुलरजाक जमादार वय ३६, रा. कोरोची, हातकणंगले याच्यासह टोळीला पकडण्यात आले. त्यांच्याकडून ६३ लिटर बनावट दारू व मद्य असा सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी राहुल अशोक लोहार २१, संतोष विलास खाडे २८, दोघे रा. कोरोची, हातकणंगले, रविराज विनायक कोठावळे २५, रा. मजले, ता. हातकणंगले या त्याच्या साथीदारांनाही पकडण्यात आले.हातकणंगलेतील आळते गावाजवळ सापळा रचून वाहनासह चौघांना पकडण्यात आले. संशयित मुसा जमादार हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

तो बनावट दारू बनवत असल्याची माहिती राज्य (liquor)उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांना मिळाली होती.त्यांचे पथक अनेक दिवसांपासून त्याच्या मागावर होते. निवडणुकांच्या काळात बनावट दारू बाजारात आणण्याची तयारी मुसा आणि त्याचे साथीदार करीत होते. आज तो दारूसाठा घेऊन निघाल्याची माहिती मिळताच आळतेजवळ सापळा रचून त्याला पकडण्यात आले.संशयित टोळी बनावट दारू कोठे बनवते, किती दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे, साहित्य कोठून खरेदी केले? याचा पुरवठा कोणाला केला जाणार होता?

अशा प्रश्नांची उकल अद्याप झालेली नाही.(liquor)चारही संशयितांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून ही माहिती घेण्याचे काम सुरू आहे. उपअधीक्षक युवराज शिंदे, निरीक्षक सदानंद मस्करे यांच्या मार्गदर्शनाखाली अभयकुमार साबळे, अजय वाघमारे, कांचन सरगर, विलास पवार, सुशांत बनसोडे, सचिन लोंढे, धीरज पांढरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.पेठवडगाव येथेही बनावट दारू तयार करणाऱ्या रणजित कांबळे (रा. पेठवडगाव) याच्या घरावर १३ नोव्हेंबराला छापा टाकण्यात आला होता. त्यानेही मद्यार्काचा वापर करून स्वतःच्या घरीच बनावट मद्य बनवले होते. असाच प्रकार पुन्हा हातकणंगले तालुक्यात उघडकीस आल्याने बनावट दारूचा हातकणंगले तालुक्यात सुळसुळाट दिसून येत आहे.
हेही वाचा :
गृहकर्ज घेतल्यानंतर क्रेडिट स्कोअर वाढला, बँका कर्जाचे व्याजदर कमी करतील, जाणून घ्या
कार मॉडिफाय करण्याआधी वाचा ‘हे’ नियम; अन्यथा लायसन्स होईल रद्द
‘ऐश्वर्याला मुस्लिम बनवून लग्न करणार!’, पाकिस्तानातून मौलानाचा मोठा दावा