पोस्ट ऑफिसद्वारे अनेक योजना राबवल्या आहेत.(interest)या योजनांमध्ये तुम्हाला भरघोस व्याज मिळते. काही योजनांमध्ये गुंतवलेली रक्कम ही दुप्पटदेखील होते. पोस्ट ऑफिसच्या योजनांमधील रक्कम ही सुरक्षित असते. त्यामुळे अनेकजण या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचे ठरवतात. दरम्यान, पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्ही लाखो रुपये मिळवू शकतात.पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमधील आरडी स्कीम ही लोकप्रिय आहे. या योजनेत तुम्हाला चांगले व्याजदरदेखील मिळते. या योजनेत फक्त १०० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात.

पोस्ट ऑफिस आरडी योजनेतील गुंतवणूकीवर जबरदस्त व्याज मिळते.(interest) या योजनेत तुम्हाला ६.७ टक्के व्याजदर मिळते. या योजनेत कोणीही अकाउंट उघडू शकतात. १० वर्षांखालील मुलांच्या नावानेदेखील अकाउंट ओपन करण्याची सुविधा देण्यात आली आहे. या योजनेत जेव्हा मुलगा १८ वर्षांचा होईल तेव्हा त्याला केवायसी करावी लागणार आहे.पोस्ट ऑफिस आरडी योजनेचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षांचा आहे. या योजनेत तुम्ही अजून काही दिवसांपासून गुंतवणूक करु शकतात किंवा प्री मॅच्युअर क्लोजर सुविधादेखील देण्यात आली आहे. जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर नॉमिनी क्लेम करु शकतात.

या योजनेत तुम्ही महिन्याला १०० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात. (interest)जर तुम्ही महिन्याला ३३३ रुपये गुंतवले तर महिन्याला १०,००० रुपये गुंतवणार आहात. त्यावर ६.७ टक्के व्याज मिळते. यामुळे तुमचे ५ वर्षात ६,००००० रुपये जमा होणार आहेत. त्यावर १.१३ लाख रुपयांचे व्याज मिळणार आहे. जर तुम्ही अजून ५ वर्षे गुंतवणूक केली तर त्यावर ५,०८,५४६ रुपये व्याज मिळणार आहे.म्हणजेच तुम्ही एकूण १७,०८,५४६ रुपये मिळवणार आहात. या योजनेत तुम्हाला चांगले व्याज मिळते.पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेत तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अकाउंट ओपन करु शकतात. तुम्हाला लोनची सुविधादेखील मिळेल. तुम्ही गुंतवलेल्या रक्कमेतील ५० टक्के रक्कम लोन म्हणून घेऊ शकतात. यावर फक्त २ टक्के व्याजदर लागू होते.
हेही वाचा :
शेतकरी बांधवांनो, ‘ही’ अट पूर्ण करा, अन्यथा कर्जमाफी मिळणार नाही!
सूर्यकुमार यादवकडून कर्णधारपद काढा, स्टार क्रिकेटरचं धक्कादायक विधान
१ जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग लागू होणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट