लाडकी बहीण योजनेत नवीन वर्षात अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत.(expired) नवीन वर्षात अनेक लाडक्या बहिणींचा लाभ बंद केला जाणार आहे. यामागचे कारण म्हणजे ईकेवायसी. केवायसी न केलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये. दरम्यान, लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्याची आज शेवटची तारीख आहे.लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीची मुदत आज संपणार आहे. मात्,र अद्यापही 45 लाख महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.प्रशासनाने आता पुन्हा मुदतवाढ देण्यास नकार दिलाय.त्यामुळे यापुढे महिलांना केवायसी करण्यास मिळणार नाहीये.

तुमच्याकडे आजचा शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवसभरात जर तुम्ही केवायसी केली तर तुमचा लाभ असाच सुरु राहील. अन्यथा तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.लाडकी बहीण योजनेत 7 हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा बेकायदेशीर लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्यांची पगारवाढ रोखण्यासोबतच पैशांची वसुलीही केली जाणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांना चांगलाच फटका बसणार आहे. त्यामुळे महिलांकडे केवायसी करण्यासाठी अजून काही तास उरले आहेत.

लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांसोबत त्यांच्या पतीचे किंवा वडिलांचे केवायसी करणे अनिवार्य आहे. याद्वारे तुमच्या उत्पन्नाची माहिती मिळणार आहे. जर तुमचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर तुमचा लाभ बंद केला जाईल. दरम्यान, जर पती आणि वडील हयात नसतील तर तुमच्यासाठी केवायसीची दुसरी प्रक्रिया सुरु केली आहे.
हेही वाचा :
प्रियांका गांधींची भावी सून अविवा बेग किती कोटींची होणार मालकीण ?
रात्री उशिरा जेवण करणं आताच थांबवा, अन्यथा पोटाच्या ५ आजारांचा धोका,
महिला पोलिसाच्या १३ वर्षीय मुलीवर बलात्कार, सावत्र बापाचं भयंकर कृत्य