नवीन वर्ष सुरु होण्याआधीच भारताने एक नवा विक्रम केला आहे.(Surpassing)भारत आता जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणारा देश बनला आहे. भारताने अर्थव्यवस्थेमध्ये जपानला पाठी टाकले आहे. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांमध्ये भारत आता चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे. ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे.सरकारी प्रसिद्धीपत्रकानुसार, भारताचा जीडीपी सध्या ४.१८ ट्रिलियन डॉलर आहे. तो सर्वाधिक जास्त आहे. यामुळे भारताने एक पाऊल पुढे टाकले आहे. पुढील चार वर्षात म्हणजेच २०३० मध्ये भारत अर्थव्यवस्थेमध्ये जर्मनीलादेखील पाठी टाकेल, असं सांगण्यात येत आहे. २०३० मध्ये जर्मनीला मागे टाकून भारत हा अर्थव्यवस्थेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर स्थान पटकवेल. भारत सर्वात मोठा तिसरा आर्थिक महासत्ता असलेला देश बनले.

देशांतर्गत वापर आणि मजबूत संरचनात्मक सुधारणांमुळे भारत जगातील सर्वात (Surpassing)वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहिली आहे. २०२५-२६ च्या दुसऱ्या तिमाही भारताचा जीडीपी हा ८.२ टक्क्यांनी वाढला. हा जीडीपी पहिल्या सहामाहिती ७.८ टक्के होते. मागील वर्षात ७.४ टक्के होता. जागतिक व्यापारात अनिश्चितता असूनही ही मागच्या तिमाहीतील सर्वात जलद वाढणारा जीडीपी आहे.

सरकारने असा विश्वास व्यक्त केला आहे की, २०३० पर्यंत भारताचा (Surpassing)जीडीपी ७.३ ट्रिलियन होईल. सध्या अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. त्यानंतर चीन दुसऱ्या स्थानावर तर जर्मनी तिसऱ्या स्थानावर आहे.आंतरराष्ट्रीय संस्थांनीही भारताच्या विकासाबद्दल आशा व्यक्त केली आहे. जागतिक बँकेने २०२६ पर्यंत भारताचा विकास दर ६.५ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. मूडीजच्या रिपोर्टनुसार, भारत जी २० देशांमध्ये सर्वाधित वेगाने वाढणारी अर्थवस्था बनेल. २०२६ मध्ये ६.४ टक्के तर २०२७ मध्ये ६.५ टक्क्यांनी वाढेल.
हेही वाचा :
प्रियांका गांधींची भावी सून अविवा बेग किती कोटींची होणार मालकीण ?
रात्री उशिरा जेवण करणं आताच थांबवा, अन्यथा पोटाच्या ५ आजारांचा धोका,
महिला पोलिसाच्या १३ वर्षीय मुलीवर बलात्कार, सावत्र बापाचं भयंकर कृत्य