जगभरात सगळीकडे नव्या वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी चालू आहे. (people) 2026 या साली करावयाचे संकल्प, नव्या वर्षाच्या कामाची यादी यासाठी आता लगबग चालू आहे. दरम्यान, तुम्ही ज्या पद्धतीने नव्या वर्षातील कामांची यादी केली आहे, त्याच पद्धतीने तुमच्या खिशावर झळ पाडणाऱ्या बदललेल्या नियमांबाबतही जाणून घेणे गरजेचे आहे. हे नियम जाणून न घेतल्यास तुमच्या तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. आधार-पॅन लिंकिंगपासून ते व्याजदरातील बदलापर्यंत बरेच महत्त्वाचे नियम आता बदलणार आहेत.नियमानुसार आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 ही आही. त्याआधी तुम्ही आधार-पॅन लिंक न केल्यास तुमचे पॅन कार्ड बंद पडू शकते. त्यामुळे भविष्यात तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांशी लिंक करून घेणे गरजेचे आहे.

अनेक बँकांनी नव्या वर्षात व्याजदरात बदल करण्याचे ठरवले आहे. (people) तसे संकेत या बँकांनी दिले आहेत. यामध्ये एफडी योजनांचाही समावेश होऊ शकतो. अर्थात हा व्याजदर कमी होणार की वाढणार हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे 1 जानेवारीनंतरच व्याजदरातील बदलामुळे सामान्यांच्या खिशाला झळ बसणार की फायदा होणार? हे समजणार आहे.

येत्या 1 जानेवारी रोजीपासून एलपीजी आणि व्यावसायिक (people) गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल होणार आहे. नव्या किमती 1 जानेवारी रोजी जाहीर होतील. विशेष म्हणजे 1 जानेवारी रोजीपासून विमानाच्या इंधनाचाही नवा भाव जाहीर केला जाईल. त्यामुळे विमानप्रवास महागणार की स्वस्त होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.भारतीय बँका आपल्या क्रेडिट कार्डच्या नियमात बदल करणार आहेत. बँकिंग व्यवस्थत वेळोवेळी बदल होत राहतात. त्यामुळे नव्या वर्षात क्रेडिट कार्डच्या नियमातही बदल होण्याची शक्यता आहे. हे बदल काय असतील ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
प्रियांका गांधींची भावी सून अविवा बेग किती कोटींची होणार मालकीण ?
रात्री उशिरा जेवण करणं आताच थांबवा, अन्यथा पोटाच्या ५ आजारांचा धोका,
महिला पोलिसाच्या १३ वर्षीय मुलीवर बलात्कार, सावत्र बापाचं भयंकर कृत्य