२०२५ हे वर्ष सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ऐतिहासिक ठरले आहे.(market)विशेषतः चांदीच्या किमतींनी यावर्षी नवा विक्रम प्रस्थापित करत गुंतवणूकदारांना चकित केले. वर्षाच्या अखेरीस चांदीने प्रतिकिलो दोन लाख रुपयांचा टप्पा ओलांडत अडीच लाखांपर्यंत मजल मारली. इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढ होईल, अशी अपेक्षा खुद्द बाजारातील तज्ज्ञांनाही नव्हती. त्यामुळे 2025 मध्ये चांदी गुंतवणूकदारांसाठी ‘सुवर्णकाळ’ ठरल्याचं चित्र पाहायला मिळालं मात्र नव्या वर्षाच्या तोंडावरच चांदीबाबत एक धक्कादायक अंदाज समोर आला आहे. चांदीच्या दरवाढीचा हा फुगा लवकरच फुटू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. येत्या काळात चांदीच्या किमतींमध्ये तब्बल 50 ते 60 टक्क्यांपर्यंत घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, यामुळे सध्या नफ्यात असलेले गुंतवणूकदारही अस्वस्थ झाले आहेत.

सोमवारी चांदीच्या किमतींनी प्रथमच अडीच लाखांचा टप्पा गाठला होता. (market)मात्र काही तासांतच मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. चांदीचा दर 2 लाख 54 हजार रुपयांवरून थेट 2.22 लाख रुपयांपर्यंत घसरला. अवघ्या काही तासांत सुमारे 30 हजार रुपयांची घसरण झाल्याने बाजारात खळबळ उडाली आणि गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. या पार्श्वभूमीवर चांदीच्या दरात आणखी मोठी कपात होणार असल्याचा अंदाज समोर येत आहे. सध्याची दरवाढ ही मागणीमुळे नसून सट्टेबाजीमुळे असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे दरवाढ टिकाऊ नसून, येत्या काळात तीव्र घसरण अपरिहार्य असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

तज्ज्ञांच्या मते चांदीच्या सध्याच्या किमती वास्तवाशी विसंगत असल्याचं स्पष्ट केलं आहे. (market)त्यांच्या मते, चांदीचे दर सामान्यतः डॉलरच्या हालचालींवर अवलंबून असतात, मात्र सध्याच्या परिस्थितीत हा नियम लागू होताना दिसत नाही. सध्याची तेजी ही 2000 मधील डॉट कॉम बबल आणि 2008 मधील कच्च्या तेलाच्या अवास्तव दरवाढीसारखी असल्याची तुलना त्यांनी केली आहे.तज्ज्ञांच्या मते, चीनने चांदीच्या निर्यातीवर घातलेल्या बंदीच्या बातमीला अनावश्यक महत्त्व दिलं गेलं आणि त्यामुळे बाजारात बबल तयार झाला. अंदाजानुसार, फेब्रुवारीपर्यंत चांदीचा भाव 100 डॉलरपर्यंत पोहोचू शकतो आणि तोच उच्चांक ठरेल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने घसरण सुरू होऊन पुढील एक ते दीड वर्षांत चांदीचे दर 50 ते 60 टक्क्यांनी कमी होऊ शकतात. म्हणजेच अडीच लाखांचा भाव थेट दीड लाखांपर्यंत घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा :
प्रियांका गांधींची भावी सून अविवा बेग किती कोटींची होणार मालकीण ?
रात्री उशिरा जेवण करणं आताच थांबवा, अन्यथा पोटाच्या ५ आजारांचा धोका,
महिला पोलिसाच्या १३ वर्षीय मुलीवर बलात्कार, सावत्र बापाचं भयंकर कृत्य