महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणुकीत अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. (unopposed) निवडणुका होण्याआधीच निकाल लागला आहे. महाराष्ट्रात जवळपास 100 नगरसेवक बिनविरोध निवडूण आले आहेत. या विजयी नगरसेवकांनी ना प्रचार केला, ना यांच्या निवडीसाठी मतदान झाले. AB फॉर्म भरला आणि हे उमेदवार डायरेक्ट नगरसेवक झाले आहेत. 29 महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीत भाजपचे 44, शिवसेना शिंदे 22 नगरसवेक, तर, राष्ट्रवादीचे 2 आणि एक अपक्ष उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे. या विजयी नगरसेवकांची आता चौकशी होणार आहे.

बिनविरोध उमेदवारांची चौकशी होणार आहे. (unopposed)राज्य निवडणूक आयोगाने याबाबत मोठा निर्णय घेतला. आयोगानंबिनविरोध उमेदवारांचा अहवाल मागवला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव, प्रलोभन किंवा जबरदस्तीचा वापर झाला का, याबाबत आयोगाने संबंधित महानगरपालिकांकडून सविस्तर अहवाल मागवले आहेत.राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी होणार असून मतमोजणी होणार आहे. 16 जानेवारीला निकाला जाहीर होणार आहे. मतदानाआधीच ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचे पाच आणि शिवसेनेचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. पिंपरी- चिंचवड, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथेही किमान एक भाजप उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.

संबंधित प्रभागांतील निवडणूक अधिकारी,(unopposed) महानगरपालिका आयुक्त निवडणूक प्रभारी आणि पोलीस आयुक्तांकडून अहवाल मागवले जातील असे आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हे अहवाल प्राप्त होईपर्यंत बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा करण्यास निवडणूक अधिकाऱ्यांना परवानगी दिली जाणार नाही. काँग्रेस, जनता दल एस आणि आम आदमी पक्षाने मुंबईतील कुलाबा येथील काही प्रभागांमध्ये उमेदवारांना दबावाखाली बेकायदेशीररीत्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून रोखल्याचा आरोप केला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर टीका करत हे सगळ ढोंग असल्याचे म्हटले आहे. हे ढोंग आहे सगळ खरं आयुक्त काय चौकशी करणार. निवडणूक अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं उमेदवारी मागे घ्या असा फोन केला. याची चौकशी केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

हेही वाचा :

देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे

कोल्हापुरात महायुतीचा जोरदार प्रचार प्रारंभ; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रेचा उत्साह

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश