सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी केंद्र सरकारकडून मोठी (youngsters) आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय डाक विभागात मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू होत असून, कोणतीही लेखी परीक्षा न देता थेट नोकरी मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही भरती विशेष महत्त्वाची मानली जात असून, देशभरातून अर्ज मागवण्यात येणार आहेत.संचार मंत्रालयाने भारतीय डाक विभागातील ग्रामीण डाक सेवक भरतीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या भरती अंतर्गत तब्बल २५,००० रिक्त पदे भरली जाणार असून, ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे. उमेदवारांना २० जानेवारी २०२६ पासून अर्ज करता येणार असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ४ फेब्रुवारी २०२६ निश्चित करण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेमध्ये ब्रांच पोस्ट मास्टर , (youngsters)असिस्टंट पोस्ट मास्टर तसेच डाक सेवक अशा विविध पदांचा समावेश आहे. केंद्र शासनाच्या सेवेत थेट प्रवेश मिळवण्याची ही संधी असल्यामुळे देशभरातील दहावी पास उमेदवारांमध्ये या भरतीबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.या भरती प्रक्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांना कोणतीही लेखी किंवा ऑनलाईन परीक्षा द्यावी लागणार नाही. उमेदवारांची निवड ही दहावीच्या गुणांच्या आधारे थेट मेरिट लिस्टद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे शैक्षणिक पात्रतेवर भर देत पारदर्शक पद्धतीने उमेदवारांची निवड होणार आहे. दहावी उत्तीर्ण सर्व उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील.

पात्रतेच्या अटींनुसार उमेदवारांना गणिताचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक (youngsters)असून, स्थानिक भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणे अपेक्षित आहे. त्यासोबतच संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणे बंधनकारक आहे. ग्रामीण भागातील कामकाजासाठी उमेदवाराला सायकल चालवता येणेही आवश्यक अट म्हणून नमूद करण्यात आली आहे.अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ Indiapostgdsonline.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करून अर्जातील सर्व माहिती भरावी, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि लागू असल्यास शुल्क भरावे. अर्ज पूर्ण केल्यानंतर त्याची प्रत जतन करून सबमिट करणे आवश्यक आहे.अनेक तरुणांचे केंद्र सरकारची नोकरी मिळवण्याचे स्वप्न असते. भारतीय डाक विभागातील ही भरती त्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्याची मोठी संधी मानली जात आहे. मात्र, अर्ज करण्याची अंतिम तारीख ४ फेब्रुवारी २०२६ असल्याने उमेदवारांनी विलंब न करता वेळेत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा :
देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश