कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
अनेकांच्या बलिदानातून मुंबई राजधानी असलेला संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला आहे. (purpose) पण गेल्या काही वर्षांपासून मुंबई महानगरी ही केंद्रशासित केली जाणार. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडले जाणार अशी चर्चा अधून मधून केली जाते आणि तशी भीतीही व्यक्त केली जाते. आताही मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा तशीच चर्चा सुरू केली गेली आहे.मतांचे ध्रुवीकरण व्हावे याच हेतूने हे सारे केले जात आहे.मुंबई शहरात बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची एक जोरदार हवा तयार केली होती. मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्याची घोषणा त्यांनी केली होती. त्याआधी या महापालिकेवर काँग्रेसची सत्ता होती. तेव्हा मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होण्याच्या आधी काही दिवस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांनी मुंबई केंद्रशासित केली जाणार असल्याचे सुतोवाच केले होते. बाळासाहेब ठाकरे यांनी हाच मुद्दा लावून धरला.

मुंबई सह संयुक्त महाराष्ट्रासाठी 105 मराठी माणसांनी हौतात्म्य पत्करले आहे. (purpose)त्यांचे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही. मुंबईला हात लावाल तर याद राखा असा सज्जड इशारा त्यांनी तेव्हा दिला होता आणि नंतर काही दिवसांनी आलेली मुंबई महापालिकेची निवडणुक त्यांनी म्हणजे शिवसेनेने जिंकली होती. वसंत दादा पाटील यांच्या आधीही तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी सुद्धा मुंबई विषयक असेच सुचक विधान केले होते. त्याचाही फायदा शिवसेना वाढीसाठी
झाला होता. गेल्या काही महिन्यांपासून अर्थात प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्याची चर्चा सुरू आहे.
त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीचा विषय रडार वर घेऊन मुंबईत आंदोलन सुरू केले. मराठी वाचवा या विषयावर ठाकरे बंधूंनी संयुक्त मेळावा घेतला होता. नंतरच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाकरे बंधूंनी मराठी माणूस आणि मराठी माणसाची मुंबई हाच विषय सातत्याने चर्चेत आणला.

मुंबईसह महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणुका जाहीर (purpose)झाल्यानंतर देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आपल्या ताब्यात राहिली पाहिजे. आणि त्यासाठी मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकली पाहिजे यासाठी ठाकरे बंधूंनी मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडली जाणार अशी भीती व्यक्त करायला सुरुवात केली आहे. दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर आणि खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंची एकत्रित मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्येच महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचे कटकारस्थान आम्ही उधळून लावू असा इशारा त्यांनी दिला आहे. मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणे किंवा तिला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देणे ही जुनी जखम आहे महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि त्यांचे दिल्लीतील मालक मुंबई तोडण्याचे कारस्थान करीत आहेत. पण त्यांचे मनसुबे आम्ही यशस्वी होऊ देणार नाही असे ठाकरे बंधूंनी या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.
यापूर्वी मुंबईच्या संदर्भात अशा अनेक वेळा चर्चेला तोंड फुटले आहे आणि तेव्हाही मुंबई महाराष्ट्राच्या हातातून निसटून जाणार. महाराष्ट्राचा लचका तोडला जाणार. मुंबईसाठी रक्त सांडणाऱ्या हुतात्म्यांचे बलिदान वाया जाणार असे खास करून म्हटले जायचे. पण ही चर्चा मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आली की सुरू व्हायची. आताही त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसते आहे. पूर्वी महाराष्ट्रात आणि देशात काँग्रेसची सत्ता होती. तेव्हा वसंतराव नाईकआणि वसंत दादा पाटील हे दोघेही मुख्यमंत्री असतानाच्या त्यांच्या काळात अशी चर्चा व्हायची आणि त्याचा फायदा शिवसेनेला व्हायचा. आता राज्यात आणि देशात भारतीय जनता पक्षाच्या एनडीए ची सत्ता आहे. आणि आता मुंबई महापालिका निवडणुका काळात पुन्हा शिवसेनेनेच मुंबईचा विषय हाती घेतला आहे. जे यापूर्वी घडलेले नाही ते आत्ता कसे काय घडणार? महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची नेमकी कारणे तरी काय आहेत? कशासाठी मुंबई तोडावयाची आहे?याचे स्पष्टीकरण मात्र ठाकरे बंधू देत नाहीत. त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेली भीती अनाठाई आहे.
हेही वाचा :
देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश