कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

मुंबईसह महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुकां अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत.(moment)महायुती आणि महाविकास आघाडी मोठ्या ताकतीने आणि मोठ्याने इर्षेने या निवडणुकीत उतरली आहे.या महासंग्रामात बाजी कोण मारणार? याचे उत्तर येणाऱ्या शुक्रवारी मिळणार आहे.संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून राहिले आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक निकालाकडे.
एका छोट्या राज्या एवढे वार्षिक बजेट असलेली ही महापालिका आपल्या हातात असली पाहिजे, या निर्धाराने महायुती, ठाकरे बंधू आणि राष्ट्रीय काँग्रेस या निवडणूक आखाड्यात उतरली आहे.उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना या निवडणुकीसाठी प्रथमच वीस वर्षानंतर एकत्र आली आहे.त्यांनी मराठी मुद्दा केंद्रस्थानी आणला असला तरी ज्यांचा जन्म मुंबईतच झाला आहे त्यांनाच मुंबईच्या समस्या माहिती आहेत.

ज्यांचा जन्म मुंबईत नाही त्यांना इथल्या समस्या समजणार नाहीत असा (moment)राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर
बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म सुद्धा पुण्यात झालेला आहे पण तरीही त्यांना मुंबईतील गल्लीबोळातील समस्या आणि नेमकी मुंबई काय आहे हे माहीत होते. त्यांच्या इतकी मुंबई कुणाला माहिती नव्हती असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असून या निवडणुकीत जन्माचा संबंध कसा येतो असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे. सध्या तरी मुंबई महापालिका निवडणूक महायुती विरुद्ध ठाकरे बंधू यांच्यातच आहे.असे निवडणूक अंतिम टप्प्यात आल्यानंतर चे चित्र आहे.
पुण्यामध्ये शरद पवार आणि अजितदादा पवार हे काका पुतणे एकत्र आले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये झालेला भ्रष्टाचार यावर अजित दादा पवार यांनी बोट ठेवले आहे तर त्यांना भाजपच्या महेश लांडगे यांनी सडेतोड उत्तर देऊन अजितदादा पवार हेच भ्रष्टाचारी असल्याचे म्हटले आहे.

अजित दादा पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्यातही पुणे आणि पिंपरी चिंचवड (moment)महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने वाकयुद्ध रंगले होते. छत्रपती संभाजी नगर मध्ये सुद्धा अशाच प्रकारचा कलगीतुरा जोरात सुरू आहे. विरोधकांनी महायुतीचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला आहे.कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालाकडे सुद्धा पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष वेधून राहिलेले आहे. महायुती विरुद्ध काँग्रेसचे सतेज पाटील असा इथे रणसंग्राम आहे. “कोल्हापूर हव कसंतुम्ही म्हणशीला तसं”ही टॅग लाईन घेऊन सतेज पाटील यांनी एक वातावरण तयार केल आहे. शिवसेनेचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी कोल्हापुरात रोड शो केला. सायंकाळी ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांची सभा झाली. काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराचा वनवास संपवा असे त्यांनी आवाहन केले. त्यानंतर एकेकाळी राजकीय मित्र असलेले सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यातशाब्दिक खडा जंगी झालेली आहे.

मी कच्चा पैलवान नाही एकदा मैदानात उतरलो की जिंकल्याशिवाय मैदानाच्या बाहेर जात नाही असे आव्हान सतेज पाटील यांनी दिल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानाची आठवण त्यांना करून दिली. कारण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही हे वास्तव त्यांनी सांगितले.कोल्हापुरातील महाविकास आघाडीचे एकमेव नेते काँग्रेसचे सतेज पाटील विरुद्ध महायुती यांच्यातच खरी लढत असल्याचे प्रचाराच्या अंतिम टप्प्यातील चित्र आहे. सतेज पाटील यांनी ही निवडणूक स्वतःसाठी अतिशय प्रतिष्ठेची केली आहे. त्यांच्या ताराबाई पार्क येथील अजिंक्यतारा या कार्यालयातून या निवडणुकीची सर्व सूत्रे हलवली जातात. तर महायुतीचे मुख्यालय राजेश क्षीरसागर यांच्या शिवालय या वास्तूमध्ये आहे.सतेज पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात कोल्हापूरकरांना अनेक ठोस आश्वासने दिलेली आहेत मात्र त्यामध्ये कोल्हापूर शहर हद्द वाढीचा विषयच नाही. त्याबद्दल काही संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महायुतीने सुद्धा कोल्हापूर शहर हद्द वाढीचा विषय प्रचारात आणलेला नाही.(moment) मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना निर्विवाद यश मिळाले तर त्यांच्याकडून सर्वसामान्य जनतेला थेट लाभ मिळेल अशी आश्वासने दिली गेली आहेत तर पुण्यात अजितदादा पवार यांनी पुणेकरांना मेट्रो आणि सार्वजनिक परिवहन उपक्रम मोफत दिला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर भाजपचे चंद्रकांत दादा पाटील यांनी अजितदादा पवार यांना लॉटरी लागली आहे की काय अशा शब्दात त्यांच्या फुकटच्या प्रवासावर प्रतिक्रिया दिली आहे.यापूर्वीच्या निवडणुकींच्या तुलनेत 2026 मध्ये होत असलेली महानगरपालिकांची निवडणूक ही सर्वाधिक खर्चिक बनली आहे. याशिवाय एका मतदाराला तीन ते चार मते देण्याचा अधिकार मिळालेला आहे.

मतदानाची ही प्रक्रिया सर्वसामान्य मतदाराला सध्या समजावून सांगितली जात असली (moment) तरी मते बाद होण्याचा धोका अधिक दिसतो आहे याशिवाय या निवडणुकीत पॅनल असे मतदान होणार नाही. क्रॉस वोटिंग मोठ्या प्रमाणावर होणार आहे.
रविवारचा दिवस हा खऱ्या अर्थाने प्रचारासाठी संडे स्पेशल ठरलेला आहे. राज्यातील सर्वच महानगरांमध्ये रविवारी उमेदवारांनी प्रचारासाठी रॅलीचे आयोजन केले होते. एकाच वेळी निघालेल्या या प्रचार मिरवणुकांनी शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी केलेली होती.राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका संपन्न झाल्यानंतर निकाल प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्वाधिक महापौर कोणत्या पक्षाचे होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिलेली असली तरी प्रत्यक्ष निकाल जाहीर झाल्यानंतर त्याचे उत्तर मिळणार आहे.

हेही वाचा :

देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे

कोल्हापुरात महायुतीचा जोरदार प्रचार प्रारंभ; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रेचा उत्साह

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश