कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर शहराची हद्द वाढ, पंचगंगा नदीचे प्रदूषण, महापुराची समस्या,(expanded) यासह विकासाशी निगडित असलेले
सर्वच प्रश्न नजीकच्या काळातसोडवले जातील असे सुस्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी कोल्हापूरात बोलताना दिल्यामुळे कोल्हापूर वासियांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने फडणवीस हे काही तासांसाठी कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.भारत हा चाळीस हजार गावांमध्ये आणि 400 महानगरामध्ये राहतो. वाढत्या शहरीकरणामुळे आणि ते अपरिहार्य असल्यामुळे निर्माण झालेल्या अव्यवस्थेवर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने काही पाय योजनांची अंमलबजावणी सुरू केली असल्यामुळे सुव्यवस्था निर्माण होईल आणि हे बदल त्याच्या पाच वर्षात दिसतील. त्यासाठी केंद्र शासनाने 50 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्रकट मुलाखतीमध्ये कोल्हापूरचे प्रश्न नजीकच्या काळात सुटलेले दिसतील
असा विश्वास कोल्हापूरकरांना दिला आहे.

काही अडचणी नसतील आणि कोल्हापूर शहराच्या हद्द वाढीचा (expanded)प्रस्ताव माझ्याकडे आला तर त्या प्रस्तावावर सही करायला माझ्याकडून पंधरा मिनिटांचा सुद्धा वेळ लागणार नाही. सध्या हयात नसलेल्या एका कोल्हापूरच्या नेत्याचा हद्द वाढीला प्रचंड विरोध होता म्हणून आम्ही हद्द वाढीला पर्याय म्हणून प्राधिकरण दिले पण त्याचा उपयोग झालेला नाही. त्या मंडळींचा हद्द वाढीला विरोध आहे त्यांनी मला येऊन भेटावे. त्यांच्यासाठी मी तासाभराचा वेळ देईन. आणि त्यांच्या शंका आणि कुशंकांचे निरसन मी करेन किंवा त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देईन. आणि मग हद्द वाढ करणे याला वेळ लागणार नाही. अशा शब्दात त्यांनी यावेळी करवीरवासियांना आश्वस्त केले.गावातील 75 टक्के सांडपाणी, आणि उद्योगाच्या माध्यमातून निर्माण होणारे 25% सांडपाणी हे थेट ओढ्याच्या माध्यमातून नदीच्या पाण्यात मिसळत असल्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषित झालेली आहे. आता या सर्व सांडपाण्यावर विविध ठिकाणी ट्रीटमेंट प्लांट उभा करून किमान पातळीवर स्वच्छ झालेले पाणी नदीत सोडले जाईल परिणामी पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त होईल.

येत्या तीन वर्षात पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त झालेली असेल अशी ग्वाही (expanded)फडणवीस यांनी दिल्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न नजीकच्या काळात संपलेला असेल असे म्हणायला हरकत नाही.कोल्हापूरला औद्योगिक क्षेत्रात फारसे गुंतवणूक होत नाही. त्यामुळे इथे बेरोजगारीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. मुंबई पुणे नागपूर इथे जसे गुंतवणूक झालेली आहे तशी गुंतवणूक कोल्हापुरात नजीकच्या काळात नक्की होणार आहे. कारण मुंबई ते बेंगलोर इंडस्ट्रियल कॉरिडॉर चे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे बायोफार्मापासून अनेक उद्योगात गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर होईल असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे. हे स्पष्ट करताना त्यांनी जुना औद्योगिक जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची ओळख आहे. त्या कालच्या गरजेनुसार राजर्षी शाहू महाराजांनी इथे उद्योग सुरू केले. प्रत्येक शहराची एक क्षमता असते. कोल्हापूर शहराला सुद्धा चांगली क्षमता प्राप्त झाली आहे. इथे प्रश्न आहेतच. वाहतूक, सांडपाणी हे प्रश्न सुटतील. रिंग रोड आणि उड्डाणपूलांच्या माध्यमातून इथली वाहतूक व्यवस्था वेगळे वळण घेईल.

कोल्हापुरात वाहतुकीसाठी टनेलची गरज नाही. दरवर्षी कोल्हापूर सांगली (expanded)परिसरात पावसाळ्यात महापुराच्या माध्यमातून 120 टीएमसी पाणी वाया जाते. त्यातील तीस ते पस्तीस टीएमसी पाणी पश्चिम महाराष्ट्रातील तसेच मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांना वळवण्याची महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेला जागतिक बँकेचे अर्थसहाय्य मिळाले आहे. प्राथमिक पातळीवर 500 कोटी रुपयांच्या कामांना सुरुवातही झाली आहे. लवकरच 3000 कोटी रुपये मिळतील आणि तीन ते साडेतीन वर्षात कोल्हापूर शहर हे महापूर मुक्त होईल. ही गेम चेंजर योजना असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही या कोल्हापुरात चांगले काम होणार आहे आणि त्याबद्दलचे काही निर्णय सुद्धा झालेले आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी सायंकाळी पुणे येथे अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी प्रकट मुलाखत घेतली. त्यामध्ये त्यांनी पुण्यासाठी कोणकोणत्या योजना राज्य शासन राबवत आहे याची माहिती दिली. पुणे हे त्यांचं आवडतं शहर आहे. त्यामुळे त्यांनी तेथे मार्गस्थ असलेल्या योजनांची माहिती दिली. पुण्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात घेतल्या गेलेल्या प्रकट मुलाखतीमध्ये ते कोल्हापूरसाठी काय देतात तिकडे सर्वांचे लक्ष वेधले होते.

मात्र अनेक महत्त्वांच्या विकासाशी निगडित असलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र (expanded)फडणवीस यांनी आश्वासक भाष्य केलेलं आहे.शहराची हद्द वाढ झाल्यानंतर कर प्रणालीत बदल होईल ही भीती निराधार आहे. उलट हद्द वाढीत येणाऱ्या गावांना तिथले जमिनीचे दर वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर परतावाही मिळणार आहे. शिवाय हद्दवाडीत आलेल्या गावांना पहिली पाच वर्षे कोणत्याही प्रकारचे जादा कर द्यावे लागणार नाहीत. त्यामुळे कोल्हापूर शहराच्या हद्द वाढीला विरोध करू नये असे त्यांनी केलेले आवाहन खूप महत्त्वाचे आहे. प्राधिकरणातून प्रश्न सुटत नाहीत. हे कोल्हापूरला दिलेल्या प्राधिकरणातून राज्य शासनाच्या लक्षात आलेली आहे. हद्द वाढीला कोणताही पर्याय नाही हे त्यांनी स्वच्छ शब्द सांगितल्यामुळे नजीकच्या काळात कोल्हापूरची हद्द वाढ होईल असे म्हणायला हरकत नाही.

हेही वाचा :

देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे

कोल्हापुरात महायुतीचा जोरदार प्रचार प्रारंभ; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रेचा उत्साह

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश