कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

विकास कामे केली आहेत, असा तुमचा दावा असेल आणि हा दावा (money) सत्याच्या कसोटीवर उतरणारा असेल तर महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी मतदारांना पैसे वाटण्याची गरज काय? हा स्वाभिमानी मतदारांना पडलेला प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उपस्थित करून त्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पण हे प्रकार आजच घडत आहेत असे नाही. यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये असे प्रकार झाले आहेत पण यापूर्वी त्यांनी कधीही हा प्रश्न उपस्थित केला नव्हता आणि नाही. त्यांचा हा प्रश्न लोकशाहीच्या निखळ आरोग्यासाठी, अतिशय योग्य असला तरी तो आत्ताच प्रश्न का पडावा हा ही प्रश्न त्या मागूनच येतो.आज पर्यंत आणि आताही असा प्रश्न कोणत्याही प्रबळ राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांनी उपस्थित केला नाही. त्यामुळे असा प्रश्न उपस्थित करून त्याबद्दल चिंता व्यक्त करणारे राज ठाकरे यांना धन्यवाद दिले पाहिजेत. केडर बेस असलेली त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना असूनही त्यांनी काही निवडणुका टाळल्या आहेत.

आत्ताही त्यांनी मोजक्याचं महापालिकांच्या निवडणुका लढवल्या आहेत.(money) त्यामुळे त्यांना बहुतांशी निवडणुकांमध्ये पैसा खर्च करण्याची वेळ आलेली नाही. पण त्यांच्या म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीच्या उमेदवाराकडून पैसा वाटला गेलेला नाही असे त्यांचे म्हणणे आहे काय? पैसे देणाऱ्यांपेक्षा पैसे घेणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे असेही ते म्हणतात. पण काळी एका हाताने वाजवता येत नाही हे त्यांनाही माहिती आहे. खरे तर देणाऱ्यांनाही लाज वाटली पाहिजे. कारण कोणताही भ्रष्ट व्यवहार असो, त्यामध्ये देणारा आणि घेणारा दोघेही गुन्हेगारच असतात. किंवा ते गुन्हा करत असतात.निवडणुकांवर पैशाचा प्रभाव अजिबात नसलेल्या निवडणुका राज ठाकरे यांनी पाहिलेल्या आहेत. उमेदवारांकडून मिळाला तर चहा आणि नाश्ता घेणारे कार्यकर्ते यापूर्वी सर्वच पक्षांमध्ये दिसत होते. उमेदवाराने कार्यकर्त्यांना जेवण दिले आहे असे चित्र त्याकाळी दिसत नव्हते. पण आत्ताच हे सारे का घडत आहे

याबद्दल राज ठाकरे यांनी चिंतन केले पाहिजे. मतदारांना, कार्यकर्त्यांना भ्रष्ट कोणी केले?(money) या प्रश्नाचे उत्तर त्यांनाही माहित आहेपण तरीही ते मतदारांच्यावर खापर फोडत आहेत.गेल्या 30 वर्षांपासून निवडणुकांवर पैशाचा प्रभाव प्रचंड प्रमाणावर वाढलेला आहे. पेड कार्यकर्ता ही संकल्पनाच धन दांडग्या उमेदवारांनी आणले आहे. पैसे पेरायचे, आणि मतांचे भरघोस पीक घ्यायचे हे साधे गणित आहे. याचा अर्थ निवडणूक खर्च हा भांडवली खर्च किंवा गुंतवणूक आहे.अशी गुंतवणूक करून निवडणूक जिंकून पुन्हा त्याच पैशातून निवडणूक जिंकायची हे दुष्टचक्र चालू आहे.निवडून आलेला कोणताही लोकप्रतिनिधी फार वेगाने श्रीमंत होतो. त्याच्याकडे अल्पावधीतच ऐश्वर्य येते. वैभव येते. आणि हे आपण दिलेल्या मतामुळेच घडले आहे. तर मग त्याच्याकडून मतासाठी पैसे घेतले तर त्यात गैर काय असा एक युक्तिवाद बहुतांशी मतदार करताना दिसतात.राज ठाकरे यांनी आणखी एक प्रश्न उपस्थित केला आहे आणि तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा. राज्यातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये सरकारच्या तिजोरीतून दिले जात आहेत.

पण हाच पैसा महिलांच्या सबलीकरणासाठी, मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करावा असे (money) सरकारला का वाटत नाही? एकीकडे दीड हजार रुपये द्यायचे आणि दुसरीकडे त्याच महिलांना महागाईला सामोरे जायला लावायचे. म्हणजे महिलांच्या हातामध्ये जेमतेम पाचशे रुपये येतात.त्यातून काहीही निष्पन्न मात्र होत नाही असे त्यांचे म्हणणे आहे, पण त्यांनी ज्यांच्या बरोबर सध्या युती केली आहे त्या उद्धव ठाकरे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील महिलांना आम्ही दरमहा 3 हजार रुपये लाडकी बहीण म्हणून देऊ असे जाहीरनाम्यात स्वच्छपणे आश्वासन दिले होते त्याचे काय? तेव्हा त्यांनी हा प्रश्न उपस्थित करणे आवश्यक होते.सत्ताधारी पक्षांकडे गैरमार्गाने आलेला प्रचंड पैसा आहे. आणि या पैशातून ते महापालिकांच्या निवडणुका जिंकण्याची मनीषा बाळगून आहेत.

प्रचंड प्रमाणावर पैसा या निवडणुकीमध्ये ओतायचा आणि निवडणुका(money) जिंकायच्याहे जरी खरे असले, त्याचीच भीती राज ठाकरे यांना आहे. आणि ही भीती ते प्रचार सभेतून तसेच मीडियाला दिलेल्या मुलाखतीतून व्यक्त करताना दिसत आहेत.
2026 मध्ये होत असलेल्या या निवडणुकांवर कधी नव्हे इतका प्रचंड पैसाउमेदवारांच्या कडून खर्च केला जातो आहे. विशेष म्हणजे खर्चासाठी काही राजकीय पक्षांनी त्यांच्या उमेदवारांनाही निधी दिला आहे. उमेदवारांनी स्वतःचा आणि पक्षाकडून मिळालेला पैसा या निवडणुकीत अक्षरशः ओतला आहे. एकूणच या निवडणुकीत सर्वसामान्य जनतेला पैशाचा धूर दिसलेला आहे.

हेही वाचा :

देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे

कोल्हापुरात महायुतीचा जोरदार प्रचार प्रारंभ; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रेचा उत्साह

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश