प्रत्येकालाच आपण कमवलेले पैसे सुरक्षित राहायला हवेत असे वाटते.(instantly) विशेष म्हणजे हेच पैसे योग्य ठिकाणी गुंतवून काही लोकांना आपल्या पैशांचे मूल्य वाढायला हवे, असेही वाटते. याच आशेपोटी अनेकजण वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या पैशांची गुंतवणूक करतात. परंतु काही ठिकाणी गुंतवणूकदारांसोबत धोकाधडी होते. तर काही ठिकाणी फायदा होण्याऐवजी तोटाच होतो. अशा स्थितीत गुंतवणूकदारांना सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय हवा असतो. हाच पर्याय आता सरकारने पोस्ट ऑफिसच्या एका भन्नाट योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे. या योजनेच्या मदतीने तुम्ही थेट दुप्पट परतावा मिळवू शकता. विशेष म्हणजे या योजनेत पैसे गुंतवले तर ते बुडण्याचा धोकाही नसतो. सोबतच तुम्हाला 100 टक्के ठरवून दिलेला परतावा मिळतो.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेचे किसान विकास पत्र असे आहे.(instantly) या योजनेत तुम्ही पैसे गुंवतवल्यास प्रत्येक वर्षाला 7.5 टक्के प्रतिवर्ष अशा हिशोबाने आकर्षक व्याज दिले जाते. योजनेत पैसे गुंतवण्यासाठी तुमचे वय किमान 18 वर्षे असणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे तुम्ही अगदी 1 हजार रुपयांपासून तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. तसेच या योजनेत जास्तीत जास्त कितीही रुपयांची गुंतवणूक करू शकता. कोणताही भारतीय नागरिक जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी खाते खोलू शकतो.

काही योजनांत तुम्ही एकदा गुंतवणूक केली की ठरविक काळापर्यंत तुम्ही (instantly)गुंतवलेले पैसे काढू शकत नाही. परंतु या योजनेत तुमच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन तुम्हाला कधीही पैसे काढून घेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. किसान विकास पत्र या योजनेत तुम्हाल 7.5 टक्के व्याज मिळते. तसेच अडीच वर्षांनी गुंतवलेली रक्कम कधीही काढून घेऊ शकता.या योजनेत तुम्ही गुंतवणूक केल्यास तुमचे पैसे थेट दुप्पट होऊ शकतात. सध्याचा व्याजदर लक्षात घेतल्यास 9 वर्षे 7 महिन्यात तुमचे पैसे दुप्पट होतात. विशेष म्हणजे या योजनेत कोणतीही जोखीम नाही.
हेही वाचा :
देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश